SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

रोमहर्षक सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला लोळवलं, अखेरच्या षटकापर्यंत धाकधूक..

भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यात काल (ता. 22 जुलै) झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने बलाढ्य वेस्ट इंडिज हा 3 धावांनी पराभव केला. मालिकेतील पहिलाच सामना जिंकल्याने भारताने मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे.

काल झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकत वेस्ट इंडीजने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर भारताने फलंदाजी करताना 50 षटकांत आकर्षक फटकेबाजी करत 308 धावा केल्या. विजयासाठी वेस्ट इंडीजला 50 षटकात 309 धावा करायच्या असताना वेस्ट इंडीजचा संघ 50 षटकांत केवळ 6 गडी गमावून 305 धावाच करु शकला आणि भारताचा 3 धावांनी विजय झाला.

Advertisement

भारताची फलंदाजी: कर्णधार शिखर धवन आणि शुभमन गिल यांच्या जोडीने शतकी भागिदारी पूर्ण केली. संघाच्या 119 धावा झाल्या असताना शुभमन 64 धावांवर धावचीत झाला. त्यानंतर शिखर 97 धावा करुन तंबूत परतला. मग श्रेयसने देखील जबरदस्त झुंज देत 54 धावा केल्या आणि बाद झाला.

वेस्ट इंडीजने 309 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या कायल मायर्सने 75 एस. ब्रुक्सने 46 धावा करत दमदार फलंदाजी केली. ब्रँडन किंगनेही 54 धावा करत अर्धशतक झळकावलं. त्यामुळे वेस्ट इंडीजची धावसंख्या विजयाच्या दिशेने जात होती. पण विजयासाठी अजूनही धावांची गरज असतान सेट फलंदाज बाद होत गेले. पण अखेरच्या षटकांमध्ये रोमारियोने नाबाद 39 तर अकेलने नाबाद 33 धावा केल्या. पण केवळ 3 धावा कमी पडल्याने वेस्ट इंडिजचा पराभव झाला आणि भारताचा विजय झाला. भारताकडून सिराज, चहल आणि शार्दुल यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 http://play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement