SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शेतात ‘डीपी’ उभारल्यास मोबदला मिळतो का..? कायदा काय सांगतो..?

शेतात उभारण्यात येणाऱ्या ट्राॅन्सफाॅर्मरमुळे बरीच जमीन पडीक ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते. त्यावर कोणतेही पीक घेता येत नाही.. शिवाय, वीज कंपनीकडून कोणताही मोबदला मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते.. त्यामुळे शेतातील विजेच्या लाईन्स किंवा डीपीसाठी मोबदल्याची काही तरतूद आहे, याबाबत जाणून घेऊ या..

कायदा काय सांगतो..?
महापारेषण (महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी) व इतर खासगी पारेषण कंपन्यांनी महाराष्ट्रात वीज वाहिन्यांचं जाळं उभारलंय. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वीज नेताना ठिकठिकाणी मनोरे (टॉवर) उभारले जातात. याबाबत राज्य सरकारने 1 नोव्हेंबर 2010 रोजी शासन निर्णय काढला होता.

Advertisement

शासन निर्णयानुसार, कोरडवाहू शेतात 66 ते 765 केव्ही क्षमतेच्या पारेषण वीज वाहिन्यांसाठी टॉवर उभारलं जात असेल, तर तेवढ्या क्षेत्रफळासाठी सरकारी बाजारभावाच्या (रेडी रेकनर) 25 टक्के मोबदला दिला जातो. बागायती व फळबागांच्या जमिनीसाठी हा मोबदला 60 टक्के केला आहे..

2017 मध्ये नवीन धोरण लागू करण्यात आलं. त्यानुसार, शेतात 66 ते 765 केव्ही क्षमतेच्या पारेषण वाहिन्यांसाठी टॉवर उभारण्यात आला असेल, तर सुरुवातीला टॉवरने व्यापलेलं क्षेत्रफळ मोजलं जाईल. नंतर त्या क्षेत्रफळावर तुमच्या भागातील रेडीरेकनर दराच्या दुप्पट मोबदला दिला जाईल.

Advertisement

मोबदल्याची ही रक्कम दोन समान टप्प्यात देण्यात येईल. पहिल्या टप्प्यात मोबदल्याची रक्कम ही टॉवरच्या पायाभरणीनंतर, तर दुसऱ्या टप्प्यातील मोबदला हा टॉवरचं काम पूर्ण झाल्यानंतर देण्यात येईल. समजा, शेतात टॉवर उभारला गेला नसेल, फक्त लाईनच्या तारा जात असल्यास रेडीरेकनरच्या 15 टक्के मोबदला मिळू शकतो.

कसा मिळेल मोबदला..?
शेतात टॉवर उभारताना संबंधित शेतकऱ्याला आधी माहितीपर नोटीस दिली जाते. नंतर 2017 सालच्या धोरणाप्रमाणे मोबदला दिला जातो. काही कारणास्तव एखादी व्यक्ती ‘नॉट रिचेबल’ (संपर्काबाहेर) असेल, तर ती ‘महापारेषण’च्या स्थानिक कार्यालयात मोबदल्यासंदर्भात अर्ज करू शकते, असे सांगण्यात आले..

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement