मराठीतील छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय विनोदी कार्यक्रम म्हणजे, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’.. जगभरातील रसिक प्रेक्षकांना या कार्यक्रमाने पोट धरुन हसायला भाग पाडलं.. कोविड संकटात तर या कार्यक्रमाने लोकांना दु:ख विसरायला लावलं.. या शोमधील कलाकार प्रचंड लोकप्रिय झाले…
सोनी मराठी चॅनेलवर हा विनोदी कार्यक्रम प्रसारित केला जात होता. मात्र, काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमाने ब्रेक घेतल्याने चाहत्यांचा हिरमोड झाला होता. मात्र, या कार्यक्रमाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच हा शो पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येत आहे..
विनोदवीर समीर चौगुले, वनिता खरात, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, गौरव मोरे व इतर मराठी कलाकारांनी आपल्या विनोदाने रसिकांना अक्षरक्ष: वेड लावलं होतं.. तुमच्या ‘टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्यजत्रा’ असं या कार्यक्रमाचं स्लोगन आहे. जगभरातील लोकांचं टेन्शन कमी करणारा हा शो ठरला आहे..
AdvertisementView this post on Instagram
Advertisement
अभिनेत्री सई ताम्हणकर व अभिनेता प्रसाद ओक हे या कार्यक्रमाच्या परीक्षकाच्या भूमिकेत दिसतात. तसेच अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या सहज सुंदर निवेदनालाही चाहत्यांची चांगली पसंती मिळत असते.. मराठीतील तगडी स्टार कास्ट व विनोदी कलाकारांमुळे हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय झाला..
15 ऑगस्टपासून भेटीला
काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमाने ब्रेक घेतला होता. त्यामुळे रसिक प्रेक्षक नाराज झाले होते. मात्र, लवकरच हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.. ‘सोनी मराठी’ने नुकताच या शोचा एक प्रोमो रिलीज केला. त्यात या कार्यक्रमातील कलाकारांमध्ये विनोदी संवाद रंगल्याचे पाहायला मिळते..
सोबतच हे कलाकार आपण रिटर्न येत असल्याची गोड बातमी चाहत्यांना देत आहेत. येत्या 15 ऑगस्टपासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुरागमन करणार आहे. विशेष म्हणजे, आठवड्यातून चार दिवस, म्हणजेच सोमवार ते गुरुवार रोज रात्री 9 वाजता हा शो सर्वांना पाहता येणार असल्याचे या प्रोमाेमध्ये म्हटलं आहे..