SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

भारत आज वेस्ट इंडिजविरुद्ध भिडणार, ‘असा’ पाहा पहिला एकदिवसीय सामना..

आजपासून शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध (Ind vs West Indies ODI) दोन हात करणार आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला आज प्रारंभ होत असून या मालिकेत नव्या खेळाडूंना संधी देण्याचे भारताचे उद्दीष्ट असणार आहे. टीम इंडियाचा सलामीवीर केएल राहुल अजूनही दुखापतीतून सावरला नाही, त्याआधीच त्याचा कोविड 19 रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे.

युवा खेळाडूंना संधी मिळणार..

Advertisement

एकदिवसीय मालिकेसाठी कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहली, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, ऋषभ पंत आणि हार्दिक पंडय़ासारख्या प्रमुख भारतीय खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. कर्णधार शिखर धवनसोबत सलामीला भारताकडे ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल आणि इशान किशन असे तीन पर्याय उपलब्ध असतील.

तर मधल्या फळीत संजू सॅमसन, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव, दीपक हुडाकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे. डावखुऱ्या रवींद्र जडेजाचा अष्टपैलू योगदानाचा प्रयत्न असेल. रवि बिष्णोई, जडेजा आणि युजवेंद्र चहल या अनुभवी फिरकीवर मोठी जबाबदारी असणार आहे. वेगवान गोलंदाजीची मदार प्रसिध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांच्यावर असणार आहे.

Advertisement

संभाव्य संघ:

भारत : शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), शार्दूल ठाकूर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवि बिष्णोई, आवेश खान, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.

Advertisement

वेस्ट इंडिज : निकोलस पूरन (कर्णधार), शे होप (उपकर्णधार), शमार ब्रूक्स, ब्रँडन किंग, कायले मेयर्स, केसी कार्टी, रोव्हमन पॉवेल, जेसन होल्डर, अकिल हुसेन, अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोटी, कीमो पॉल, जेडन सील्स.

वन डे मालिकेचे वेळापत्रक

Advertisement

22 जुलै – पहिली वन डे – पोर्ट ऑफ स्पेन
24 जुलै – दुसरी वन डे – पोर्ट ऑफ स्पेन
27 जुलै – तिसरी वन डे – पोर्ट ऑफ स्पेन

सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होतील. सामन्यांचे थेट प्रक्षेपण FanCode.com आणि DD स्पोर्ट्स वाहिनीवर होणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 http://play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement