SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 22 जुलै 2022 : सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

✒️ आज पंतप्रधान मोदींकडून दिल्लीतील हॉटेल अशोका येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना फेअरवेल डिनर दिलं जाणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थिती लावणार

✒️ गुजरात निवडणुकीपूर्वी केजरीवाल यांची मोठी घोषणा, 300 युनिट वीज मोफत तर सत्तेत आल्यास 31 डिसेंबर 2021 पर्यंतची सर्व जुनी वीज बिले माफ करण्याचं आश्वासन

Advertisement

✒️ सोनिया गांधींची ईडी चौकशी संपली: नॅशनल हेराल्ड केसमध्ये पहिल्या दिवशी 3 तास चौकशी, सोमवारी 25 जुलैला पुन्हा बोलावले; अनेक भागांत काँग्रेसचे आंदोलन सुरूच

✒️ आज आदित्य ठाकरेंची शिवसंवाद यात्रा मनमाड ते संभाजीनगरपर्यंत पोहचणार, संध्याकाळी 5.30 वाजता संभाजीनगर येथे शिवसंवाद मेळावा होणार

Advertisement

✒️ विजय देवरकोंडा-अनन्या पांडेचा जबरदस्त ॲक्शनपट ‘लायगर’चा ट्रेलर प्रदर्शित, विजय बॉक्सरच्या भूमिकेत दिसणार; येत्या 25 ऑगस्टला चित्रपट प्रदर्शित होणार

✒️ नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाच्या कामाला गती मिळणार, रेल्वे प्रकल्पाच्या सुधारित अंदाजपत्रकास राज्य सरकारने दिली मान्यता, राज्य 2402.59 कोटी निधी देण्याचा अंदाज

Advertisement

✒️ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याशी संबंधित वरळीतील सीजे हाऊस इमारतीतील 4 मजल्यांवर ईडीची टाच, दाऊद इब्राहिमचा विश्वासू इक्बाल मिर्ची कुटुंबियांशी जागेचा व्यवहार करण्यात आल्याचा आरोप

✒️ कर्नाटकात 15 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक, सलग तिसऱ्यांदा देशात अव्वल स्थानावर; नीती आयोगाने गुरुवारी तिसरा इनोव्हेशन इंडेक्स केला जारी

Advertisement

✒️ आता भारतीयांनाही करता येणार अंतराळाची सैर: इस्त्रो तयार करणार स्पेस टूरिस्ट फ्लाइट; वर्षाखेरपर्यंत होणार 3 चाचण्या

✒️ फोर्ब्सने भारतातील टॉप 100 डिजिटल स्टार्स 2022 ची पहिली यादी केली प्रसिद्ध, निखिल शर्माचे ‘प्रवास’ श्रेणीत सर्वाधिक 9.06 इनस्कोअर मिळवून यादीत अव्वल स्थान
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement