SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

राज्यात ‘या’ भागात मुसळधार पाऊस पडणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज..

मागील काही दिवसांपासून पावसाने जोरदार बॅटिंग करत राज्यात धुमाकूळ घातला आहे, राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस पडून नद्यांना पूर आल्याने गावागावांत पाणी शिरल्याने घरांचे नुकसान झाले, काही बेघर झाले तर काही नागरीकांना प्रशासनाच्या मदतीने निवारा केंद्रात हलवण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यांत पूरपरिस्थिती असल्याने मदतीचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले आहेत.

आता 3 ते 4 दिवसांपासून राज्यात पावसाने थोडी (Weather Update) विश्रांती घेतली असून काही काही वेळाने का होईना पावसाच्या हलक्या ते माध्यम सरी राज्यातील अनेक जिल्ह्यांत बरसत आहेत. देशभरात पावसाने धुमाकूळ घातला असता राज्यातदेखील अनेक धरणांमधून विसर्ग सोडला जात आहे. दरम्यान हवामान तज्ञ के. एस . होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या चार ते पाच दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी अधूनमधून जोरदार सरीसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Advertisement

याशिवाय कोकणामध्येही पाऊस ओसरला असला तरी काही भागांत जोरदार सरी पडत आहेत. काही हांगाच्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे तर मात्र पाऊस कमी झाल्याने राज्यातील शेतकऱ्यांना शेतीकामांसाठी मोकळीक मिळाली आहे. यंदा अधिक पाऊस झालेल्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये (Weather Update) पाऊस कमी झाला. मोठ्या प्रमाणात नद्यांना पाणी असल्याने धोकादायक असणारी पातळी आता कमी झाली आहे. नद्यांची पाणीपातळी सध्या आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही उघडल्याचा चित्र दिसतंय. सातारा आणि पुणे जिल्ह्यातील काही भागांत दररोज हलक्या सरी अधूनमधून येत आहेत.

राज्यात येलो अलर्ट: आज नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, अमरावती, वर्धा आणि गोंदीया या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांनाही मागच्या आठवडाभरात झालेल्या जोरदार पावसाचा फटका बसला आहे. मराठवाडा विभागातील अंदाजे 3 लाख 38 हजार 88 हेक्टरचे नुकसान झाले असून, याचा 3 लाख 51 हजार 499 शेतकऱ्यांना (Weather Update) फटका बसला आहे. राज्यातील नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नुकसान झाल्याचं समजत आहे. सध्या काही भागांत नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement