SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

तुमच्या मोबाईलमधील ‘हे’ अ‍ॅप्स सर्वाधिक धोकेदायक, लगेच करा डिलिट..!!

गेल्या काही दिवसांत सायबर क्राईमचे प्रमाण वाढले आहे.. आधुनिक तंत्रज्ञान आलं, तसं फसवणुकीचे अनेक फंडेही सुरु झाले.. सायबर तज्ज्ञांनी आपल्या हुशारीचा वापर चुकीच्या गोष्टींसाठी सुरु केला.. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने लोकांना गंडा घालण्यास सुरुवात केली..

सायबर चोर फसवणूकीसाठी नवीन पद्धतींचा अवलंब करीत आहेत, त्यापैकीच एक पद्धत म्हणजे ‘व्हायरस’ आणि ‘मालवेअर’ पद्धती.. फ्रेंच सुरक्षा संशोधकांनी नुकतंच मालवेअर’च्या नवीन फॅमिलीबद्दल लोकांना अलर्ट केलंय. प्रीमियम सेवेचं सबस्क्रिप्शन घेतल्यानंतरही हा ‘मालवेअर’ मोबाईलमध्ये प्रवेश करीत असल्याचे सांगण्यात आले..

Advertisement

मागील काही दिवसांत ‘ऑटोलायकोस’ (Autolycos) नावाचं ‘मालवेअर’ 8 अँड्रॉइड अ‍ॅप्समध्ये (Harmful Malware Apps) आढळलंय, जे 3 दशलक्षपेक्षा जास्त वेळा ‘डाउनलोड’ करण्यात आलं आहे. या ‘मालवेअर’मुळे प्रभावित झालेले हे 8 अ‍ॅप्स युजर्ससाठी धोकेदायक ठरु शकतात.

कॅमेरा एडिटर, किबोर्ड थीम, व्हिडिओ एडिटर यांसारखी वैशिष्ट्ये देणारी ही अ‍ॅप्स आहेत. मात्र, या अ‍ॅप्सच्या माध्यमातून हे ‘मालवेअर’ तुमच्या मोबाईलमध्ये शिरल्यास ते तुमचा ‘क्रेडेन्शियल डेटा’ चोरतात. चुकीच्या पद्धतीने हा डाटा वापरून तुम्हाला त्रास देऊ शकतात, असं सांगण्यात आलं..

Advertisement

खालील अ‍ॅप लगेच डिलिट करा

  • व्लॉग स्टार व्हिडिओ एडिटर (Com.Vlog.Star.Video.Editor)
  • क्रिएटिव्ह 3D लाँचर (App.Launcher.Creative3d)
  • फनी कॅमेरा (Com.Okcamera.Funny)
  • वाउ ब्युटी कॅमेरा (Com.Wowbeauty.Camera)
  • GIF इमोजी कीबोर्ड (Com.Gif.Emoji.Keyboard)
  • रेझर कीबोर्ड आणि थीम (Com.Razer.Keyboards-हे गेमिंग आणि टेक कंपनी Razer शी संबंधित नाही)
  • फ्रीग्लो कॅमेरा 1.0.0 (Com.Glow.Camera.Open)
  • कोको कॅमेरा V1.1 (Com.Toomore.Cool.Camera)

जून 2021 पासून गुगल प्ले स्टोअरवरुन (Google Play Store) हे 8 अ‍ॅप्स 30 लाखांहून अधिक वेळा डाउनलोड करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, गुगलने 6 महिन्यांपूर्वीच हे 8 अ‍ॅप्स काढून टाकले असले, तरी त्याची ‘APK’ आवृत्ती अद्याप ऑनलाइन उपलब्ध असून, हे अ‍ॅप्स डाऊनलोड केले गेले आहेत. त्यापासून सावध राहण्याची इशारा देण्यात आला आहे..

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement