SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पेट्रोलची बचत होणार? फक्त 10 हजार रुपयांत खरेदी करा ‘ही’ बाईक..

गेल्या काही वर्षांपासून आपली प्रसिद्धी टिकवून आजही अनेकांना परवडणारी बाईक म्हणून आपलं स्थान टिकवून ठेवणारी हिरो स्प्लेंडर प्लस ऐन पेट्रोल दरवाढीत सर्वसामान्यांच्या खर्चाची बचत करत आहे. देशभरात अनेक लोक जास्त मायलेज असणाऱ्या बाईक्स चालवत असतात, जेणेकरून पेट्रोलची बचत होईल. म्हणून Hero Splendor Plus ला लोक अधिक पसंत करत असतात.

Hero कंपनीने ज्यावेळेस बाईक लॉंच केली तेव्हा बाईकच्या मायलेजबद्दल कंपनीने दावा केलाय की, Hero Splendor Plus ही तब्बल 80.6 kmpl चे मायलेज देते आणि कंपनीने दावा केलाय की, हे मायलेज ARAI ने प्रमाणित केलेलं आहे. जर तुम्हालाही कमी बजेटमध्ये येणारी ही सेकंड हँड बाईक खरेदी करायची असेल तर ऑफर्स वाचा..

Advertisement

DROOM वेबसाईटवर असणाऱ्या ऑफरनुसार, येथे Hero Splendor Plus चे 2015 चे मॉडेलविषयी माहीती आणि किंमत दिलेली आहे. त्यानुसार 16 हजार रुपयांना ती विकली जात आहे. ही बाईक खरेदी केल्यावर तुम्हाला एक फायनान्स प्लॅनसुद्धा मिळणार आहे.

QUIKR वेबसाईटवर दुसरी ऑफर दिली आहे. येथे हिरो स्प्लेंडर प्लस या बाईकचे 2012 चे मॉडेल आणि माहीती पोस्ट केलेली आहे. त्यानुसार या बाईकची किंमत तिथे 13 हजार रुपये दिली गेली आहे. तसेच या बाईकवर कोणताही फायनान्स प्लॅन किंवा इतर ऑफर दिली जात नाही. म्हणून वन टाईम पेमेंट करून तुम्हाला ती खरेदी करावी लागणार आहे.

Advertisement

OLX वेबसाईटवर देखील बेस्ट ऑफर देण्यात आली आहे. हिरो स्प्लेंडर प्लसबद्दल माहीती आणि फोटो व किंमत पोस्ट केली गेली आहे. हिरो स्प्लेंडर प्लस चे 2013 चे मॉडेल तुम्ही येथे खरेदी करु शकता, येथे या बाईकची किंमत फक्त 10 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. एकदाच सर्व रक्कम भरून तुम्ही बाईक खरेदी करू शकणार आहात. यासाठी तुम्हाला कोणताही फायनान्स प्लॅन मिळणार नसल्याची माहीती आहे.

(वरील किंमती ऑफरनुसार बदलू शकतात व मायलेज प्रत्यक्षात कमी-जास्त होऊ शकते, याची नोंद घ्या.)
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement