SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

भारतातील ‘वर्ल्ड कप’ स्पर्धा रद्द होणार..? केंद्र सरकारच्या ‘या’ निर्णयाचा फटका…

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे.. पुढील वर्षी म्हणजेच 2023 मध्ये भारतात वन-डे वर्ल्ड कप (ODI world cup) खेळवला जाणार आहे.. त्यासाठी ‘बीसीसीआय’ची जोरदार तयारी सुरु असताना, त्याला ब्रेक लागण्याची शक्यता आहे.. मोदी सरकारच्या एका निर्णयामुळे भारतात होणारी वर्ल्ड कप स्पर्धा दुसरीकडे हलवली जाण्याची शक्यता आहे..

काही दिवसांपूर्वीच मोदी सरकारने क्रीडा स्पर्धांवरील करात (Tax) मोठी वाढ केली होती.. त्यानुसार, हा कर 10 टक्क्यांवरुन थेट 21 टक्के एवढा करण्यात आला आहे. त्यामुळे भारतात 2023 मध्ये वर्ल्ड कप खेळवला जाईल, तेव्हा स्पर्धेतून मिळणाऱ्या एकूण नफ्यावर 21 टक्के कर भारत सरकारला भरावा लागणार आहे..

Advertisement

‘आयसीसी’ची कमाई घटणार..

भारतात नियोजित असलेल्या या वर्ल्ड कपमधून जवळपास 4000 कोटी रुपयांचा नफा होणार असल्याचे बोलले जाते.. त्यामुळे 21 टक्के करानुसार भारत सरकारला जवळपास 840 कोटी रुपये कर स्वरुपात द्यावा लागणार आहे. त्यामुळे ‘आयसीसी’ हा वर्ल्ड कप दुसऱ्या देशात खेळवण्याचा प्रयत्न करू शकते.

Advertisement

भारतातील ‘वर्ल्ड कप’ प्रसारणाचे हक्क ‘स्टार स्पोर्ट्स’कडे आहेत. त्यामुळे हा कर ‘स्टार स्पोर्ट्स’ला भरावा लागेल.. मात्र, ‘स्टार स्पोर्ट्स’ने ‘आयसीसी’ला हा कर वजा करून पैसे देईल. त्यामुळे ‘आयसीसी’ला कमी पैसे मिळणार आहेत. ‘आयसीसी’ ही मिळकत सर्व देशांमध्ये वाटत असते. त्यामुळे सगळ्यांच देशांच्या पदरात कमी रक्कम पडणार आहे..

ऑस्ट्रेलियामध्ये लवकरच टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा होत आहे.. पण ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने आपल्या सरकारकडे करात सूट देण्याची विनंती केलीय.. तसाच प्रयत्न ‘बीसीसीआय’लाही करावा लागेल. ‘बीसीसीआय’ला सरकारशी बोलून तोडगा काढावा लागेल. मात्र, तसा तोडगा निघाला नाही, तर हा वर्ल्डकप ‘युएई’ किंवा श्रीलंका व बांग्लादेशात खेळवला जाऊ शकतो.

Advertisement

भारतात यापूर्वी 2016 मध्ये भारतात झालेल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतही कर सवलतीवरून वाद झाला होता. त्यावेळी आयसीसीने थेट स्पर्धाच रद्द करण्याची धमकी ‘बीसीसीआय’ला दिली होती. त्यानंतर हा वाद मिटला व भारतात ही स्पर्धा झाली. आताही तसेच काही होईल, अशी आशा आहे..

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement