SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

खुशखबर! मोफत गॅस सिलिंडर मिळणार, ‘असा’ घ्या ऑफरचा लाभ..

गॅस सिलेंडरचे भाव आता 1000 रुपयाच्या वर गेले आहेत. फक्त 500 रुपयांच्या जवळपास असणारा गॅस सिलिंडर आता साडे अकराशे रुपयांपर्यंत गेला आहे. यामुळे सर्वसामान्यांना धक्का बसला आहे. महागाईने त्रस्त लोक आता सिलिंडरला वेगवेगळे पर्याय शोधत आहेत. पण जर तुम्हीही ऑनलाईन गॅस सिलिंडर (Gas Cylinder) बुक करत असाल, तर तुम्हाला मोफत गॅस सिलिंडर मिळवता येणार आहे.

देशातील मोठी कंपनी Paytm ने आपल्या ग्राहकांसाठी 100% Cashback देण्याच्या ऑफरची घोषणा केली आहे. फक्त लक्षात असू द्या की, ही ऑफर फक्त काही भाग्यवान विजेत्यांसाठीच आहे. पेटीएमकडून अशी ऑफर पहिल्यांदाच नव्हे तर यापूर्वीही देण्यात आलेली आहे.

Advertisement

मोफत गॅस सिलिंडर मिळविण्याच्या आकर्षक ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर प्रथम Paytm App ओपन करून त्यात तुम्हाला Cylinder Booking च्या पर्यायावर जावं लागेल. त्यामध्ये Cylinder Booking ऑप्शनमध्ये गेल्यानंतर आता समोर अनेक सारे पर्याय दिसतील. मग तुम्हाला घरातील गॅस सिलेंडरचा पुरवठादार कंपनी कोणती आहे हे निवडावे लागेल.

जर तुमच्या घरात समजा Indane चे सिलिंडर तुम्ही वापरत असाल तर पेटीएममध्ये तुम्हाला पुढे Indane या पर्यायाची निवड करावी लागेल. मग नंतर Consumer Number (ग्राहक क्रमांक) भरावा लागेल. आपल्या रजिस्टर नंबर वरून बुकिंग करू शकता. सर्व गोष्टी भरल्यानंतर आता कनेक्शनची डिटेल तुमच्या डोळ्यासमोर दिसेल. या माहीतीच्या आधारे तुम्हाला कॅशबॅक मिळू शकतो. ही ऑफर पेटीएमकडून दिल्या जाणाऱ्या योजनांचा एक भाग असून लकी विनर्सला हा लाभ मिळणार आहे.
जर तुमच्याकडे Paytm App नसेल तर तुम्ही App Store वर जाऊन Paytm असं सर्च करून डाउनलोड करू शकता.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement