SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

Ola, Bajaj ला मिळाली टक्कर; ‘ही’ इलेक्ट्रिक स्कुटर एकाच चार्जमध्ये धावणार 146km

मुंबई : भारतात सध्या इलेक्ट्रिक स्कुटरच्या निर्मितीमध्ये जोरदार काम सुरु आहे. यामध्ये Ather, ola, bajaj chetak या गाडयांना विशेष मागणी असून या कंपन्यांमध्ये एकमेकांना वारंवार टक्कर देण्याचे चित्र नेहमीच समोर येते. यामध्ये Ather कंपनीने आता पुढचे पाऊल टाकले आहे. Ather Energy 19 जुलै 2022 रोजी भारतात अपडेटेड Ather 450X आणि 450+ इलेक्ट्रिक स्कूटर या दोन स्कुटर लाँच करण्यात आली आहे. Ather 450X स्कूटरची ही तिसरी जनरेशन असून या स्कूटरला सध्या बाजारात विक्रीसाठी असलेल्या दुसऱ्या जनरेशनच्या व्हेरियंटपेक्षा अनेक अपग्रेड मिळण्याची शक्यता आहे.

Ather कडून लाँच करण्यात येणाऱ्या या नवीन स्कुटरमध्ये ग्राहकांना बरेच बदल अपेक्षित आहेत. कंपनी आपल्या सध्याच्या मॉडेलच्या किरकोळ समस्यांवर मात करण्याचा प्रयत्न या नवीन मॉडेलमध्ये करणार आहे. 450X 2022 ला मोठी बॅटरी, अधिक श्रेणी, चांगली कामगिरी आणि अनेक प्रगत वैशिष्ट्ये मिळणार आहेत, असं बोललं जात आहे. कंपनीने 2020 मध्ये जनरेशन 2 प्रकार आणताना मोठी बॅटरी देण्याचा निर्णय घेतला होता.

Advertisement

आता नवीन जनरेशनमध्ये डिझाइन आणि मोटरमध्ये बरेच बदल होण्याची अपेक्षा केली जाऊ शकते. इलेक्ट्रिक स्कुटरच्या मार्केटमध्ये इतर प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटरशी स्पर्धा करण्यासाठी हे नवीन जनरेशन मॉडेल Ather 450X ला मजबूत करेल. भारतात TVS iQube, Ola S1 Pro आणि बजाज चेतक यांसारख्या प्रतिस्पर्ध्यांना जोरदार टक्कर देण्यासाठी Atherचं हे नवीन मॉडेल अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावेल. या स्कूटरची किंमत सध्याच्या मॉडेलपेक्षा 10,000 ने अधिक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या नवीन जनरेशन स्कुटरची रेंज 108km पर्यंत असू शकते असा अंदाजही वर्तवण्यात येत आहे.

Advertisement