अहमदनगर : सहयाद्री मल्टीसिटी फायनान्स लिमिटेड ही कंपनी महाराष्ट्र राज्यात फायनान्स क्षेत्रात तब्बल 5500 नवीन नोकऱ्यांची निर्मिती करणार आहे अशी माहिती कंपनीचे चेअरमन संदीप थोरात यांनी दिली आहे. अहमदनगर जिल्ह्यात सध्या सह्याद्री फायनान्सच्या एकूण 32 शाखा आहेत. अहमदनगर येथे कंपनीचे कॉर्पोरेट ऑफिस असून भविष्यात महाराष्ट्रात नवीन 500 शाखांची निर्मिती करण्यात येणार आहे.
राज्यातील विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या विभागातील सर्व जिल्ह्यात, तालुक्यात तसेच तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये या नवीन शाखा निर्माण होणार आहेत. कर्ज वाटप करणे हे कंपनीचे मुख्य उद्दिष्ट्य असेल. व्यावसायिक लोन, बचत-गट लोन, शेती कर्ज, वाहन कर्ज या महत्वाच्या कर्ज प्रकारात कंपनी काम करेल.
इतर कंपन्यांच्या तुलनेने सर्वात कमी व्याजदराने कर्ज वाटण्यास कंपनी प्रयत्नशील असेल. कंपनीच्या नवीन शाखांसाठी विभागानुसार हेड ऑफिस तसेच इतर पदांची निर्मिती करण्यात येणार आहे. 5500 नवीन नोकऱ्यांच्या निर्मितीमुळे महाराष्ट्राच्या प्रगतीत सह्याद्री फायनान्सचा खारीचा वाटा राहील. तसेच, रोजगार निर्मितीसाठी हे मोठे केंद्र असेल असे कंपनीच्या व्हा.चेअरमन प्रीती सांगवाण यांनी सांगितले.
सह्याद्री फायनान्समध्ये नोकरीसाठी खालील मेल id वर आपण अर्ज करू शकता : [email protected]
या पदांची होणार निर्मिती
सह्याद्री फायनान्सच्या राज्यभरातील ब्रांचसाठी झोनल मॅनेजर, असिस्टंट CEO, जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, लोन ऑफिसर, क्रेडिट मॅनेजर, ब्रांच मॅनेजर, कॅशिअर या पदांसाठी भरती होणार आहे. यामध्ये सर्वाधिक संख्या मॅनेजर तसेच लोन ऑफिसर या पदांसाठी आहे.
ग्रामीण भागातील तरुण-तरुणींना देणार संधी
सह्याद्री फायनान्स तर्फे जास्तीत जास्त कर्जवाटप ग्रामीण भागात केले जाणार आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसह व्यावसायिकांना जास्तीत जास्त लोन देऊन त्यांच्या व्यवसायाला हातभार लावणे हे मुख्य उद्दिष्ट असल्याने कंपनीमध्ये ग्रामीण भागातील तरुण तरुणींना नोकरीत प्राधान्य दिले जाईल.