SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

देशातील ‘या’ खाद्यतेल कंपनीच्या निर्णयाने सर्वसामान्यांच्या खिशाची झळ होणार कमी

नवी दिल्ली :

देशात खाद्यतेलावर आणि इतर अनेक खाद्यपदार्थांशी निगडित असणाऱ्या गोष्टींवर केंद्राचा (GST) लागणार आहे. आजपासून अनेक वस्तूंसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. अशातच सर्वसामान्यांना दिलासा देणारी एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. खाद्यतेल क्षेत्रातील दिग्ग्ज कंपनी अदानी विल्मरने खाद्यतेलाच्या दरात प्रति लिटर 30 रुपये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. फॉर्च्युन ब्रँड अंतर्गत उत्पादने विकणाऱ्या या कंपनीने जागतिक स्तरावर तेलाच्या किंमत घट झाल्याने हा निर्णय अदानी विल्मरने घेतला असून सर्वसामान्यांच्या खिशाला बसणारी झळ यामुळे कमी होणार आहे. यासोबतच कंपनीने सोयाबीन तेलाच्या किंमतीबाबतही निर्णय घेतला आहे.

Advertisement

सोयाबीन तेलाच्या दरात सर्वात मोठी कपात अदानी विल्मरकडून करण्यात आली आहे. नवीन किंमतीसह माल लवकरच बाजारात पोहोचणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. तत्पूर्वी धारा ब्रँड अंतर्गत खाद्यतेल विकणाऱ्या मदर डेअरीने सोयाबीन आणि भात कोंड्याच्या तेलाच्या किंमतीमध्ये कपात केली होती.

खाद्यतेलाच्या किमतींवर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारच्या अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाने 6 जुलै रोजी बोलवण्यात आलेल्या बैठकीत सर्व खाद्य तेल कंपन्यांना जागतिक किमतीतील घसरणीचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश देण्यात आले होते. जागतिक स्तरावर तेलाच्या किमतीत झालेली घट आणि खाद्यतेलाच्या किमतीतील कपातीचे फायदे ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे सरकारचे प्रयत्न पाहता, अदानी विल्मरने खाद्यतेलाच्या किमती आणखी कमी केल्या आहेत असं कंपनीकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

Advertisement

खाद्यतेलाच्या कंपनीत कपात केल्यानंतर आता फॉर्च्युन सोयाबीन तेलाची किंमत 195 रुपये प्रति लिटरवरून 165 रुपये, सूर्यफूल तेलाची किंमत 210 रुपये प्रति लीटरवरून 199 रुपये प्रति लिटर, मोहरीच्या तेलाची किंमत 195 रुपये प्रति लिटरवरून 190 रुपये प्रति लीटर, कोंड्याच्या तेलाची किंमत 225 रुपये प्रति लीटरवरून 210 रुपये प्रति लीटर करण्यात आली आहे.

Advertisement