SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

गाडीचा विमा काढल्यास ‘असे’ होतात फायदे, नवीन विमा पाॅलिसीबाबत जाणून घ्या…

सर्व प्रकारच्या वाहनांसाठी मोटार विमा दिला जातो. दुचाकीसाठी विम्याचे वेगळे नियम आहेत, तर चारचाकीसाठी वेगळे.. नवीन मोटार वाहन कायद्यानुसार प्रत्येक वाहनाचा विमा उतरवणं आवश्यक आहे. विमा नसताना वाहन चालविल्यास 2 हजार रुपये दंड किंवा तीन वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.

मोटार विम्याचे दोन प्रकार आहेत, एक थर्ड पार्टी विमा, तर दुसरा सर्वसमावेशक मोटार विमा.. ऑटोमोबाईल इन्शुरन्समध्ये थर्ड-पार्टी दायित्वांचा समावेश होतो. तुमच्या वाहनामुळे दुसऱ्या वाहनाचे किंवा मालमत्तेचं काही नुकसान झालं, तर ‘थर्ड पार्टी इन्शुरन्स’मुळे भरपाई मिळवता येते..

Advertisement

सर्वसमावेशक मोटार विम्याअंतर्गत, अपघातामुळे चालक, मालक आणि प्रवाशाचा मृत्यू झाला किंवा अपंगत्वासाठी विम्याचे लाभ मिळतात. मात्र, तुमच्या वाहनाचा विमा (Vehicle Insurance) उतरवलेला नसेल तर.. अशा वेळी तुमच्या वाहनाचा अपघात झाल्यास, संपूर्ण खर्च तुम्हालाच करावा लागतो.

मोटार वाहन विम्याचे फायदे

Advertisement
  • अपघात, दंगल, चोरी, दहशतवाद, नैसर्गिक आपत्ती, आग, स्फोट, पूर, वादळ, भूकंप आदी आपत्तींमुळे वाहनाचे नुकसान झाल्यास विमा कंपनीकडून भरपाई दिली जाते.
  • तृतीय पक्षाच्या कायदेशीर दायित्वाच्या अंतर्गत मालमत्तेला झालेल्या कोणत्याही हानीसह, अपघाती मृत्यू, तसेच एखाद्याला झालेल्या दुखापतीचाही समावेश आहे..
  • वैयक्तिक अपघात संरक्षणाअंतर्गत, विमा कंपनी ड्रायव्हरला दुखापत झाल्यास वैद्यकीय उपचाराचा संपूर्ण खर्च उचलते.

विमा खरेदीसाठी आवश्यक कागदपत्रे

  • ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅन कार्ड
  • रहिवासी पुरावा
  • वाहनाचे आरसी
  • पासपोर्ट फोटो

दरम्यान, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने विमा कंपन्यांना ‘पे-एज-यू-ड्राइव्ह मोटर विमा पॉलिसी’ सुरू करण्यास परवानगी दिलीय. त्यामुळं वाहनधारकांना सरासरी मर्यादा सेट करता येते. प्रीमियमवर सूट मिळवता येते. विमा कंपन्यांकडून 7,500 किमी, 5,000 किमी आणि 2,500 किमीचे तीन स्लॅब ऑफर केले जातात.. वाहनांचा वापर कमी असणाऱ्या ग्राहकांना त्याचा फायदा होतो.

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement