SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

स्मार्टफोनचे ‘हे’ सीक्रेट कोड पाहून व्हाल आश्चर्यचकित; वाचा, महत्वाची माहिती

मागील काही वर्षांपूर्वी आपल्या सिममधील बॅलन्स जाणून घेण्यासाठी * किंवा # ने सुरू होणारा कोड डायल करावा लागत होता. कालांतराने त्याचा वापर संपुष्टात आला. पण तुम्हाला माहीत आहे का? अजूनही अनेक असे सिक्रेट कोड आहेत, जे तुमच्या फोनमधील लपलेली माहिती चुटकीसरशी उघड करू शकतात. हे अँड्रॉइडमधील गुप्त कोड्स तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात, विशेषत: जेव्हा तुम्ही चुकून तुमच्या डिव्हाइसवर सिस्टम लॉक इंस्टॉल केले असेल किंवा मोबाईल हरवला असेल.

सीक्रेट्स कोड्सचा वापर कसा कराल?
हे Android गुप्त कोड वापरण्यास अतिशय सोपे आहेत. तुम्हाला फक्त तुमच्या डायलर स्क्रीनवर जाऊन कोड टाकायचा आहे. हे अगदी फोन नंबर डायल करण्यासारखे आहे. कोड डायल करण्यासाठी फक्त कॉल बटण दाबा. हा कोड तुम्हाला तुमच्या डिव्हाइसच्या IMEI नंबरपासून ते फोन दुरुस्त करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या लपलेल्या मेनूपर्यंत बरीच माहिती सांगतात.

काही खास अँड्रॉइड गुप्त कोड :- (Android secret codes) :
▪️ *#06# : हा कोड तुमच्या डिव्हाइसचा IMEI नंबर दाखवेल
▪️ *#*#225#*#* : हा कोड तुमच्या डिव्हाइसची कॅलेंडर स्टोरेज माहिती दाखवतो
▪️ *#*#426#*#* : हा कोड Google Play सेवा माहिती दाखवतो
▪️ *#*#1234#*#* : तुमच्या डिव्हाइसची PDA सॉफ्टवेअर आवृत्ती दाखवते
▪️ *#0*#: हा सॅमसंगचा सीक्रेट कोड आहे. याचा वापर सॅमसंगच्या फोनमधील हार्डवेयरची माहिती जाणून घेण्यासाठी केला जातो.
▪️ *#*#64663#*#*: या कोडचा वापर शाओमी यूजर्स करू शकतात. या कोडला डायल केल्यानंतर हार्डवेयरची माहिती डिस्प्ले समोर येईल.
▪️ *#800#: हा कोड रियलमीच्या फोन्सवर काम करतो. याला डायल करून रियलमी यूजर्स आपल्या फॅक्ट्री मोड तसेच फीडबॅक मेन्यू ओपन करू शकतात.

दरम्यान, हे कोड साधारणपणे सर्व Android स्मार्टफोनवर काम करतात. तथापि काही कोड केवळ मर्यादित उपकरणांसाठी आहेत.

Advertisement