SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकींग: भीषण अपघातात 13 प्रवाशांचा मृत्यू, बस नदीत कोसळली?

मध्य प्रदेशातील धारमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यातील खलघाट येथे मोठा अपघात झाला असून अपघात झालेल्या बसबद्दल माहीती समोर आली असून बसमध्ये असणाऱ्या प्रवाशांपैकी अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आहे.

मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात झालेल्या या घटनेत इंदौरहून निघालेली ही बस जळगावमधील अमळनेरकडे येत असताना एसटी बस नर्मदा नदीत कोसळली. यामध्ये 12 ते 15 जण बेपत्ता झाले आहेत. यामध्ये 13 प्रवाशांचे मृतदेह सापडले असून 15 जणांना वाचविण्यात यश आले आहे, अशी प्राथमिक माहीती मिळाली आहे.

Advertisement

प्राप्त माहीतीनुसार, मध्य प्रदेशातील खलघाट येथील संजय सेतू पुलावरून जळगावकडे येणाऱ्या बसचं नियंत्रण सुटल्याने एसटी बस पुराच्या पाण्याने ओथंबून वाहत असलेल्या 25 फूट खोल नर्मदा नदीपात्रात कोसळली. यानंतर या घटनेची माहिती मिळताच लगेचच मदतकार्य पोहोचले. बचाव कार्य सुरू करून रुग्णवाहिकेद्वारे धामनोद सरकारी हॉस्पिटलमध्ये जखमींना उपचारासाठी नेण्यात आले आहे.

मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यात या बसचा भीषण अपघात (Indore-Jalgaon Bus Accident) झाला असला तरी या बसमध्ये महाराष्ट्रातील किती जणांचा समावेश आहे ही माहीती अद्याप नाहीये. या बसमध्ये एकूण 50 ते 55 प्रवासी होते असं सांगितलं जातंय. घटनास्थळी पोलीस आणि NDRF ची टीमदेखील पोहोचलेली आहे. याशिवाय अपघातग्रस्त बसला क्रेनच्या मदतीने नदीबाहेर काढलं आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement