SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

31 तारीख पर्यंत करून घ्या ‘ही’ तीन कामे; नाहीतर बसेल आर्थिक भुर्दंड

2022 या वर्षातील जुलै महिना संपायला आता 15 दिवसाहुन कमी कालावधी शिल्लक आहे. या महिन्याच्या शेवटी म्हणजे 31 जुलै रोजी अशा अनेक गोष्टींची अंतिम मुदत संपणार आहे, ज्याचा परिणाम तुमच्या खिशावर पडणार आहे. म्हणून आम्ही तुम्हाला अशा 3 महत्त्वाच्या कामांबद्दल सांगत आहोत, जे तुम्हाला 31 जुलैपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे नाहीतर तुम्हाला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागेल.

ITR फाइलिंग करणे आवश्यक :

Advertisement

इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची शेवटची तारीख ही 31 जुलै जवळ आहे. आर्थिक वर्ष 2021-22 किंवा मूल्यांकन वर्ष 2022-23 साठी ITR दाखल करण्याची लेट झाल्यास तुम्हाला लेट फी भरावा लागू शकते. करदात्याचे करपात्र उत्पन्न 5 लाख रुपयांपर्यंत किंवा त्यापेक्षा कमी असल्यास, त्याला लेट फीस म्हणून 1,000 रुपये भरावे लागतील. जर करदात्याचे करपात्र उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्याला 5000 रुपये विलंब शुल्क भरावे लागेल.

पीक विमा :

Advertisement

प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY) अंतर्गत, शेतकरी त्यांच्या पिकांचा विमा काढून आर्थिक नुकसान टाळू शकतात. PMFBY मध्ये नोंदणी करण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे. नोंदणी ऑनलाइन किंवा ऑफलाइन केली जाऊ शकते.

किसान सन्मान निधीसाठी KYC :

Advertisement

पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही या महिन्यापर्यंत केवायसी करणे आवश्यक आहे. e-kyc ची अंतिम तारीख 31 जुलैपर्यंत आहे. जे शेतकरी या तारखेपर्यंत ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत, त्यांना पुढील हप्त्यासाठी पैसे मिळणार नाहीत. हप्त्याचे पैसे न मिळाल्यास तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.

Advertisement