SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अलर्ट : सिम कार्डचा ‘हा’ स्कॅम ठरतोय घातक; बँक खाते होतेय अवघ्या काही मिनिटात रिकामे!

मुंबई : सध्याच्या काळात असे अनेक धोकादायक ऑनलाइन घोटाळे समोर आले आहेत. हे ऑनलाइन घोटाळे बऱ्याचदा आपले आर्थिक नुकसान करणारे असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका ऑनलाइन घोटाळ्यापासून सावध करणार आहोत. जेणेकरून तुमच्याकडून अशी चूक होणार नाही आणि आर्थिक नुकसानही होणार नाही.

सिम स्वॅप फ्रॉड काय आहे?
सिम स्वॅप फ्रॉड म्हणजे सिम कार्डला बदलणे किंवा त्याच नंबरवर दुसरे सिम कार्ड घेणे आहे. सिम स्वॅपिंग मध्ये तुमच्या मोबाइल नंबरने एक नवीन सिमचे रजिस्ट्रेशन केले जाते. त्यानंतर तुमच्या मोबाइलचे नेटवर्क गायब होते. त्यानंतर हॅकरकडील मोबाइल नंबर त्याचे सीम कार्ड चालू होते. याचाच गैरफायदा घेत तुमचा नंबर ओटीपी मागतो. त्यानंतर तुमच्या खात्यातील पैसे गायब केले जातात.

Advertisement

सिम स्वॅप स्कॅम हा कसा काम करतो?
हॅकर्सना तुमच्या सिमची कॉपी कशी मिळते? असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर लक्षात घ्या की, साध्या फिशिंग तंत्राच्या मदतीने तुमचा फोन नंबर, ईमेल आयडी, वाढदिवस इ. तुमच्या मोबाइल ऑपरेटरशी संपर्क साधून, हॅकर्स त्याच नंबरवर नवीन सिम घेतात आणि सिम स्वॅप स्कॅम करतात.

स्मार्टफोन वापरताना या गोष्टी लक्षात ठेवा :-
हा किंवा यासारखे इतर घोटाळे टाळण्यासाठी तुमचा स्मार्टफोन काळजीपूर्वक वापरा. कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका आणि तृतीय-पक्ष अॅप्स (third party application) डाउनलोड करण्याचा प्रयत्न करू नका. कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी ते काळजीपूर्वक वाचा आणि तपासा.

Advertisement

मेसेज आणि मेल्सपासून सावध राहा :-
आकर्षक ऑफर आणि डिस्काउंटच्या रूपात तुम्हाला अनेक मेसेज आणि मेल्स मिळतात, जे पाहण्यास अगदी खरे वाटतील. अशा ईमेल आणि मजकूरांपासून दूर राहा आणि त्यावर क्लिक करू नका, ते फिशिंग हल्ल्याचे माध्यम असू शकतात.

Advertisement