SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

फक्त 600 रुपयांत मिळतोय 3300 जीबी डेटा; ‘या’ कंपनीचा भन्नाट प्लॅन

मुंबई : जास्तीत जास्त ग्राहक मिळवण्यासाठी सर्वच टेलिकॉम कंपन्या नेहमीच नवनवीन भन्नाट रिचार्ज प्लॅन देऊन ग्राहकांना खुश करत असतात. आता अशाच एका कंपनीबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जी कंपनी फक्त 600 रुपयांत 3300 जीबी डेटा देत आहे.

सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने आता एक नवा रिचार्ज प्लॅन लॉन्च केला आहे. ही कंपनी यूजर्ससाठी नेहमीच
एकापेक्षा एक स्वस्त आणि चांगले प्लान देत असते. BSNL ने आता ब्रॉडबँड प्लॅन जाहीर केला आहे. या प्लॅन मध्ये तुम्हाला 3300 जीबी (3.33TB) डेटा वापरायला मिळणार आहे.

कसा आहे हा प्लॅन पाहा :

हा प्लॅन तुम्हाला केवळ 599 रुपयांत उपलब्ध असून यासोबत तुम्हाला 3300 जीबी डेटा मिळणार आहे. विशेष म्हणजे हा प्लॅन 60Mbps सोबत वापरता येणार आहे. त्याचवेळी, FUP मर्यादा पूर्ण झाल्यानंतर वेग 20Mbps पर्यंत कमी होईल. याशिवाय प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधाही दिली जात आहे.

या प्लॅनवर 90% डिस्काउंट :

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी पहिल्या महिन्याच्या बिलावर 90 टक्के सूट (500 रुपयांपर्यंत) देखील देत आहे. परंतु, या योजनेत कोणताही अतिरिक्त लाभ दिला जात नाही. जर तुम्ही घरून काम करत असाल किंवा ऑनलाइन अभ्यास करत असाल तर तुम्ही हा प्लॅन नक्कीच निवडू शकता.

Advertisement