SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

200 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतात ‘हे’ जबरदस्त रिचार्ज प्लॅन

जास्तीत जास्त ग्राहक मिळवण्यासाठी सर्वच टेलिकॉम कंपन्या सध्या नवनवीन रिचार्ज प्लॅन आणत आहेत. एअरटेल आणि रिलायन्स जिओमध्ये या दोन्ही कंपन्या देखील परवडणाऱ्या आणि स्वस्त रिचार्ज प्लॅनसह अधिकाधिक नवीन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्लान्समध्ये डेटा, कॉलिंग आणि एसएमएसची सह अनेक सुविधा मिळणार आहेत. जाणून घेऊया अशाच काही प्लॅन्स बाबत अंत्यत थोडक्यात…

एअरटेलचे 200 पेक्षा कमी किमतीचा रिचार्ज प्लॅन :

Advertisement

एअरटेलचे 200 रुपयांच्या आतमध्ये दोन प्रीपेड प्लॅन असून, ज्यांची किंमत 179 रुपये आणि 155 रुपये आहे. 179 च्या प्लॅन बाबत बोलायचे झाले तर या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता असून एकूण 2 जीबी हाय-स्पीड डेटा देते. याशिवाय या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलची सुविधा मिळते.

155 चा रिचार्ज प्लॅन : एअरटेलच्या 155 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची वैधता 24 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये एकूण 1 जीबी डेटा उपलब्ध आहे. या प्लॅनचे रिचार्ज केल्यावर एअरटेल ग्राहकांना अमर्यादित लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलची सुविधा मोफत मिळू शकते. प्लॅनमध्ये 300 एसएमएस सुविधाही उपलब्ध आहे.

Advertisement

जिओचे 200 पेक्ष्या कमी किंमतीवाले रिचार्ज प्लॅन :

जिओचे 200 रुपयांच्या आतमध्ये तीन प्रीपेड प्लॅन असून, ज्याची किंमत साधारण 119 / 149 / 179 अशी आहे.
Jio चा 119 रुपयांचा प्लॅन: जिओच्या या 119 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 1.5GB डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि 300 SMS सुविधा मिळतात. यामध्ये तुम्हाला सर्व जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शन देखील मिळते आणि या प्लॅनची वैधता 14 दिवसांची आहे.

Advertisement

Jio चा Rs 149 प्लॅन: जिओचा हा प्रीपेड प्लॅन 20 दिवसांसाठी 1GB प्रति दिन डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 SMS चे फायदे देते. या 149 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला सर्व जिओ अॅप्सवर मोफत प्रवेश देखील दिला जातो.

Jio चा रु. 179 प्लॅन: जिओचा रु. 179 प्लॅनमध्ये, तुम्हाला दररोज 1GB डेटा, प्रति दिन 100 SMS, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि सर्व Jio अॅप्सची मोफत सदस्यता मिळेल. या प्लॅनची ​​वैधता 24 दिवसांची आहे.

Advertisement

VI 200 रुपयांपेक्षा कमी प्लॅन :

Vi चा 149 रुपयांचा प्लॅन:
Vi च्या 149 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि एकूण 1GB इंटरनेट दिले जाते. या प्लॅनची ​​वैधता 21 दिवस आहे आणि तुम्हाला यामध्ये एसएमएस दिले जात नाहीत.

Advertisement

Vi चा 155 रुपयांचा प्लॅन:
155 रुपयांच्या बदल्यात तुम्हाला या प्लॅनमध्ये 24 दिवसांसाठी 300 एसएमएस, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि 1GB इंटरनेट दिले जाईल.

Vi चा 199 रुपयांचा प्लॅन:
या प्लानमध्ये तुम्हाला 199 रुपयांमध्ये 1GB दैनिक डेटा, 100 SMS आणि कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंगचे फायदे मिळतील. हा प्लान 18 दिवसांच्या वैधतेसह येतो.

Advertisement