SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल. घरातील कामात मन रमून जाईल. बर्‍याच दिवसांनी नातेवाईकांची गाठ पडेल. कामातील बदल जाणून घ्यावेत. योग्य तांत्रिक माहिती मिळवावी. जिभेवर नियंत्रण ठेवा. उत्पन्न स्थिर राहील. व्यवहार करताना जोखीम पत्करू नका. विचारपूर्वक वागा. घरातील ताणतणामुळे त्रास होण्याची शक्यता आहे. मित्रपरिवारासह वेळ घालवा. मित्र मंडळीची गाठभेट होण्याची शक्यता आहे.

वृषभ (Taurus): नातेवाईकांशी सलोख्याचे संबंध वाढवा. जुन्या गोष्टींवर फार चर्चा नको. विचारपूर्वक खर्च करावा. शेअर्स मधून लाभ होईल. अचानक धनलाभाची शक्यता. नोकरीत यश मिळेल. धार्मिक कार्यात मन लागेल. बोलण्यावर ताबा ठेवा. आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. मित्रपरिवारासह आदराने वागा. घरातील मंडळींची साथ लाभेल. विचारपूर्वक निर्णय घ्या. जवळचा प्रवास सावधानतेने करावा.

मिथुन (Gemini) : वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. परोपकाराची जाणीव ठेवून वागाल. इतरांना मनापासून मदत कराल. जोडीदाराविषयी गैरसमज संभवतात. मालमत्ता खरेदी विक्रीसाठी शुभ दिन. रोजगार मिळण्याची शक्यता. थोडासा ताण तणाव जाणवेल. खाण्यावर नियंत्रण ठेवा. तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज व्यायाम करा. घरातील मंडळींचे विचार पटणार नाहीत. परंतु त्या विचारांचे पालन करुन योग्य ती कृती करा.

कर्क (Cancer) : आततायीपणे कोणतेही काम करू नका. स्वभावातील हट्टीपणा कमी करावा. प्रकृतीची वेळेवर काळजी घ्यावी. पत्नीशी वाद वाढवू नये. अती शिस्त कामाची नाही. वाहन किंवा कुठलीही मशीन वापरताना काळजी घ्या. शत्रू मागे हटतील. उत्पन्न स्थिर राहील. आज कंबर दुखी किंवा मानदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे झाल्यास दुर्लश्र करु नका. तसेच आजच्या दिवशी आराम केल्यास उत्तम.

सिंह (Leo) : सारासार विचाराला प्राधान्य द्यावे. गैरसमजुतीतून वाद वाढू शकतो. लोकनींदेकडे दुर्लक्ष करावे. मानापमानाचे प्रसंग येऊ शकतात. काटकसरीने वागावे लागेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक समस्या वाढल्याने चिंता वाढेल. नवी आर्थिक नियोनज करावे लागेल. आजचा दिवस उत्साहात जाईल. मित्र परिवारासह बाहेर जाण्यास वेळ काढा. कामे करताना घाईने निर्णय घेऊ नका. आई-वडिलांची साथ लाभेल.

कन्या (Virgo) : दिवस प्रसन्नतेत घालवाल. आवडीच्या गोष्टी करायला वेळ मिळेल. कुटुंबात तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होईल. मनातील इच्छा पूर्ण होईल. जवळचे मित्र भेटतील. शेअर मार्केट, म्युच्युअल फंडातून लाभ मिळण्याची शक्यता. व्यवसायासाठी केलेला प्रवास यशस्वी होईल. वेळेत कर्ज फिटण्याची शक्यता. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी कळेल.

तुळ (Libra) : इतरांवर तुमची उत्तम छाप पडेल. काही गोष्टीत तडजोडीला पर्याय नाही. केलेल्या कामाचे कौतुक होईल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. तरुण वर्गाशी मैत्री कराल. घरात पाहुण्यांचे आगमन होईल. शेअर मार्केटमधून लाभ होण्याची शक्यता. मोठे काम करण्याची संधी मिळेल. डोक शांत ठेवून विचारपूर्वक कृती करणे आवश्यक आहे. आर्थिक व्यवसायात पैशांचे व्यवहार जपून करा. घरातील वयोवृद्धांचा मान राखा. थोडा अशक्तपणा वाटेल पण आराम केल्यास उत्साहित वाटेल.

वृश्‍चिक (Scorpio) : कौटुंबिक स्थैर्याचा विचार करावा. व्यापारी वर्गाला चांगला लाभ मिळेल. जुनी इच्छा पूर्ण कराल. भावनेच्या भरात वाहून जाऊ नका. तब्येतीची वेळेवर तपासणी करावी. कायदेशीर अडचणी येण्याची शक्यता. प्रयत्न केल्यास यश मिळेल. नोकरीत उच्चअधिकार मिळण्याची दाट शक्यता. कामे केल्यास चुका होण्याची शक्यता टळेल. आई-वडिलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या.

धनु (Sagittarius) : जोडीदाराशी क्षुल्लक कारणामुळे मतभेद संभवतात. घाईघाईने निष्कर्ष काढू नका. कामात मन रमवावे. बुद्धीला अधिक चालना द्यावी लागेल. अपेक्षित व्यावसायिक लाभ होईल. व्यवसायासाठी केलेला प्रवास लाभदायक ठरेल. नोकरीत यश मिळेल. कुठल्याही प्रकारची घाई धोकादायक ठरेल. आज प्रेमप्रकरणी चुका होणार नाही याची दक्षता घ्या. घरातील मंडळींचे आदेश पाळा. ताणतणाव कमी करण्यासाठी स्वत:ला वेळ द्या.

मकर (Capricorn) : मानसिक चंचलतेवर मात करता येईल. अपचनाचा त्रास जाणवेल. कामे घाईघाईने उरकू नका. सहकार्‍यांकडून मदत घ्यावी लागेल. वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करावे. उत्पन्न वाढण्याची शक्यता. व्यापार आणि व्यवसायात यश मिळेल. जोडीदाराचा सहवास लाभेल. अन्नदान करा. मित्रपरिवारासह वाद घालणे टाळा. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळेल. आई-वडिलांकडून साथ लाभेल.

कुंभ (Aquarious) : चांगला व्यावसायिक लाभ होईल. दूरच्या प्रवासाचा योग संभवतो. मुलांकडे बारीक लक्ष ठेवावे. मेहनतीची कामे अंगावर येतील. काही कामना पुरेसा वेळ द्यावा. मित्रांचा सहवास लाभेल. व्यापार व्यवसायात स्थैर्य प्राप्त होईल. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल. जास्त पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. प्रिय व्यक्तीला वेळ द्या. कामाच्या बाबत हलगर्जीपणा करु नका.घरातील मंडळींशी आदराने वागा.

मीन (Pisces) : मनातील नसत्या कल्पना काढून टाकाव्यात. क्षणिक आनंदाने हुरळून जाऊ नका. गप्पांचा ओघ आवरता घ्यावा. जवळचा प्रवास सुखाचा होईल. झोपेचे तक्रार जाणवेल. मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा. दुःखद बातमी मिळण्याची शक्यता. अनोळखी व्यक्तीवर विश्वास टाकू नका. परिवारासंबंधित कामे पूर्ण करा. प्रकृतीकडे लक्ष द्या आणि वेळेवर आजाराचे निदान करा. जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीशी वाद घालणे टाळा.

Advertisement