SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दिल्लीनंतर पंजाबमध्ये ‘ही’ दैनंदिन गरज फुकटात; भगवंत मान यांचा दमदार निर्णय

मुंबई :

पंजाबमध्ये आपचे नेते अरविंद केजरीवाल आणि भगवंतसिंग मान यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यात आल्यानंतर कामांचा आणि निर्णयांचा धडाका सुरु आहे. पंजाबमध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर नागरिकांना वीजबिल माफ करण्यात येईल, अशी घोषणा आम आदमी पक्षातर्फे प्रचारात करण्यात आली होती. पंजाबमध्ये दणदणीत विजय मिळवून सरकार स्थापन झाल्यानंतर आता लगेचच वीजबिलाबाबत सरकारकडून निर्णय घेण्यात आला आहे. पंजाबमध्ये 300 यूनिट वीज मोफत (Free Electricity) देण्यात येणार असून त्याची अंमलबजावणी 1 जुलै पासून करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केली आहे.

Advertisement

मान यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत या निर्णयाबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. पंजाब सरकारच्या मोफत वीज योजनेचा फायदा राज्यातील 51 लाख कुटुंबाना होणार असं देखील मान यांनी ट्विट करत म्हटलं आहे. जुलै-ऑगस्ट महिन्याचे बिल सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात येणार असून यातील चांगली बातमी अशी की, 51 लाख घरांना शून्य रुपयांचे वीजबिल येईल. आम्ही जे सांगितले, ते केले आहे, असं मान यांनी आपल्या ट्विटद्वारे म्हटलं आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाची सत्ता आल्यानंतर वीजबिलाच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून मुख्यमंत्री भगवंत मान यांना सातत्याने प्रश्न केले जात होते.

 

Advertisement

थकीत वीजबिले माफ केली जातील, आणि राज्यात २४ तास वीजपुरवठा केला जाईल या आश्वासनांची अंबलबजावणी होणार की नाही? याबाबत विरोधकांनी भगवंत मान सरकारला धारेवर धरले होते. अखेर जुलै महिन्यापासून मोफत वीज योजनेची अमंलबजावणी सुरु झाल्याची माहिती मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पत्रकार परिषदेत आणि ट्विट करत दिली आहे. दिल्ली राज्यानंतर मोफत वीज मिळणारे पंजाब हे दुसरे राज्य असणार आहे.

Advertisement