SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

तुम्हीही कमावू शकता लाखो रुपये, आजची गुंतवणूक उद्या ठरू शकते फायद्याची..

क्रिप्टो मार्केटमध्ये गेल्या दोन महिन्यापासून बिटकॉईनच्या किंमतीत घसरण सुरुच होती. बिटकॉईन (BTC) वगळता इतर क्रिप्टो शेअर्सचे दर देखील खाली आहेत. पण ऐतिहासिक नीचांक पातळी गाठल्यानंतर बिटकॉईनच्या दरामध्ये कालपेक्षा आज 1.87% टक्क्यांची वाढ झाली आहे.

बिटकॉइनच्या गुंतवणूकदारांची पुन्हा पुन्हा चिंता वाढत आहे. गुंतवणूकदारांचा प्रतिसाद कमी असल्याने दर सातत्याने उतरत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. परंतु ज्यांना बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करून लाखो कमवायचे असतील आणि पुरेशी रिस्क देखील घेऊ शकता तर पुढील काही वर्षांत बिटकॉईन तुम्हाला लाखो रुपये कमवून देऊ शकतो.

Advertisement

माहीतीनुसार, 3 आठवड्यापूर्वी बिटकॉईनची किंमत जवळपास 6 लाखांनी घसरली होती, याचा फायदा नवीन गुंतवणूक करणाऱ्यांना जास्त होईल, तर यापूर्वी ज्यांनी गुंतवणूक केली त्यांना बिटकॉईनचा दर घसरल्यानंतर तोटा झाला किंवा काहींनी अजूनही बिटकॉईन होल्ड करून ठेवला आहे. याचा फायदा असा की भविष्यात बिटकॉईन पुन्हा नवी उंची गाठून 50 ते 60 हजार डॉलर्सवर जरी गेला तरी तुम्ही पाच पट पैसे तो विकून कमावू शकता.

Crypto Market नेहमी चालू असते. त्यामुळे क्रिप्टोकरन्सीचे दर हे सतत बदलत असतात. सध्या बिटकॉईनचा दर 16 लाखांच्या जवळपास आहे. आज भारतीय बाजारात एका बिटकॉईनची किंमत 16 लाख 85 हजार 997 रुपये इतकी आहे. ही किंमत कालच्या तुलनेत आज काहीशी वाढली असल्याचं दिसत आहे. भाव वधारले म्हणून काहीसा दिलासा मिळाला आहे.

Advertisement

आजचा डोजेकॉईन आणि इथेरिअमचा दर

आज जागतिक मार्केटमध्ये इथेरिअम कॉइनचा (Etherium) दर 1 हजार 194.79 डॉलर एवढा आहे. तर हाच दर भारतीय बाजारात 99 हजार 999 रुपये इतका आहे. आज डोजेकॉईनचा (Dogecoin) दर जागतिक बाजारात 0.062 डॉलर एवढा आहे. तर हाच दर भारतीय बाजारात 5.22 रुपये एवढा आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement