SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

महागाईत भर..!! हाॅटेलमध्ये राहण्यासाठी आता जादा पैसे मोजावे लागणार…!!

पुढील काही दिवसांत पर्यटनाचा विचार असेल नि त्यासाठी हाॅटेलवर राहणार असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे.. जीएसटी परिषदेने नुकतीच विविध वस्तूंवर ‘जीएसटी’ लागू केला असून, त्यामुळे सामान्यांच्या खिशावरील भार वाढणार आहे.. विशेष म्हणजे, आता खाद्यपदार्थांसह हाॅटेलमध्ये राहण्यासाठीही जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

येत्या 18 तारखेपासून हा बदल होणार आहे.. हॉटेल रूमवरही आता ‘जीएसटी’ आकारला जाणार आहे. आता तुम्हाला 1000 रुपयांच्या हॉटेल रूमसाठीही ‘जीएसटी’ भरावा लागेल. यापूर्वी 1000 रुपयांच्या रूमवर ‘जीएसटी’ लागू नव्हता. मात्र, ‘जीएसटी कौन्सिल’ने 29 जून रोजी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात नवे ‘जीएसटी’ दर जाहीर केले आहेत.

Advertisement

किती ‘जीएसटी’ असणार..?

‘जीएसटी कौन्सिल’ने 1000 ते 7500 रुपयांपर्यंतच्या रुमवर 12 टक्के ‘जीएसटी’ आकारण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तसेच 7500 रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या खोल्यांवर 18 टक्के ‘जीएसटी’ आकारला जाणार आहे.. प्रस्तावित बदल येत्या 18 जुलैपासून लागू होणार असल्याचे सांगण्यात आले..

Advertisement

कराची मर्यादा वाढवण्यासाठी मोदी सरकारने विविध वस्तू व सेवांच्या करात मोठे बदल केले आहेत. मात्र, त्यामुळे सामान्यांच्या खिशावरील बोजा आणखी वाढणार आहे. कुठेही जाण्यापूर्वी हाॅटेलमध्ये खाण्यासाठी, त्याच बरोबर राहण्यासाठी किती पैसे लागतील, याचा विचार करावा लागणार आहे..

समजा, तुम्ही दोन दिवसांसाठी 900 रुपये प्रति रात्रीसाठी खोली बूक केली असेल, तर आतापर्यंत तुम्हाला 1800 रुपये मोजावे लागत होते, पण आता 18 जुलैपासून त्यावर 12 टक्के ‘जीएसटी’ही लावला जाईल. त्यामुळे 216 रुपये कर भरावा लागेल, म्हणजेच तुम्हाला 1800 रुपयांऐवजी 2016 रुपये भरावे लागणार आहेत..

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement