SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना, 50 रुपये बचतीवर मिळणार 35 लाख..?

पोस्ट ऑफिसच्या काही बचत योजना (Post office Scheme) म्हणजे भारतातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी चांगल्या फायद्याच्या योजना आहेत. पोस्ट ऑफिस बचत योजना पूर्णपणे जोखीममुक्त असण्यासोबतच मोठा परतावा देणाऱ्या देखील आहेत. पोस्ट ऑफिसच्या ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना कार्यक्रमांतर्गत अनेक योजना सुरू करण्यात आल्या त्याचपैकी ‘ग्राम सुरक्षा योजना’ ही एक योजना आहे.

तुम्ही ग्राम सुरक्षा योजने (Gram Suraksha Yojana) साठी दररोज फक्त 50 रुपये गुंतवल्यास, तुम्ही स्वतःसाठी 35 लाख रुपयांचा परतावा मिळू शकणार आहे. यासाठी म्हणजेच ‘ग्राम सुरक्षा योजना’ मध्ये तुम्ही दरमहा 1500 रुपये जमा करत राहिल्यास किंवा दररोज 50 रुपयांची बचत करून या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला 35 लाख रुपयांपर्यंत लाभ मिळू शकतो.

Advertisement

गुंतवणूकदाराला या योजनेची ही रक्कम 80 व्या वर्षी बोनससह मिळते. यामध्ये, योजनेत गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीचे वय 80 वर्षे पूर्ण होण्याआधी मृत्यू झाल्यास, त्याच्या नॉमिनीला ही रक्कम मिळते. तुम्हालाही अशी गुंतवणूक हवी असेल, जिथे चांगला नफाही मिळत असेल, तर दर महिन्याला ठराविक रक्कम नियमितपणे जमा केली की येत्या काळात तुम्हाला 31 ते 35 लाख रुपयांचा लाभ होणार आहे.

या योजनेत फायदा कसा होईल एकदा माहीत करून घ्या. एखाद्या व्यक्तीने 55 वर्षांसाठी गुंतवणूक करायचं ठरवलं असेल आणि जर वयाच्या 19 व्या वर्षी या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर त्या व्यक्तीला दर महिन्याला 1515 रुपये हप्ता भरावा लागणार आहे. याशिवाय 58 वर्षांसाठी 1463 रुपये आणि 60 वर्षांसाठी 1411 रुपये असणार आहे. याचा परतावा मिळण्याच्या वेळेस तो पॉलिसी खरेदीदाराला 55 वर्षांसाठी 31.60 लाख रुपये, 58 वर्षांसाठी 33.40 लाख रुपये व 60 वर्षांसाठी 34.60 लाख रुपये मॅच्युरिटी लाभ मिळणार असल्याची माहीती आहे.

Advertisement

गुंतवणूक करायची असल्यास नियम वाचा..

▪️ 19 ते 55 वर्षे वय असणारा कोणत्याही भारतीय नागरिकास या योजनेत गुंतवणूक करता येईल.
▪️ या योजनेअंतर्गत किमान विमा रक्कम 10,000 ते 10 लाख रुपयांपर्यंत असू शकते.
▪️ या प्लॅनचे प्रीमियम पेमेंट मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक करता येऊ शकते.
▪️प्रीमियम भरण्यासाठी तुम्हाला 30 दिवसांची सवलत मिळते.
▪️महत्वाचं म्हणजे या योजनेवर 4 वर्षांनी तुम्ही कर्जही घेऊ शकता.
▪️ ही योजना घेतल्यानंतर 3 वर्षांनी तुम्ही सरेंडरही करु शकता, परंतु अशा वेळेस तुम्हाला कोणताही लाभ मिळणार नाही.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement