SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

भारतावर 150 वर्ष राज्य करणाऱ्या ब्रिटनला मिळणार भारतीय वंशाचा पंतप्रधान!

जगभरात भारतीय राजकारणाचा डंका वाजत असताना अजून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ही खऱ्या अर्थाने भारतीयांसाठी अभिमानास्पद बातमी आहे. कारण ज्या ब्रिटिशांनी भारतावर 150 हुन अधिक काळ राज्य केले, त्या ब्रिटनचे राज्य आता एका भारतीय व्यक्तीच्या हाती जाण्याची शक्यता आहे. आता भारतीय वंशाचे असणारे आणि यूकेचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक हे पुढील पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. ऋषी सुनक हे कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते असून पुढच्या पंतप्रधानपदासाठी मतदानाच्या पहिल्या व दुसऱ्या फेरीत ते आघाडीवर आहेत. यामुळे ऋषी सुनक हे आता ऐतिहासिक यशाकडे आगेकूच करत असल्याचे सांगण्यात येते.

सुनक यांच्या अर्थमंत्रीपदाच्या कार्यकाळाबद्दल ब्रिटनच्या प्रसारमाध्यमांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या असल्या तरी देखील पंतप्रधानपदासाठी झालेल्या मतदानावरून ते कंझर्व्हेटिव्ह पक्षातील सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून समोर येत असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वीही त्यांची पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून वर्णी लागली होती.

Advertisement

सुनक हे भारतीय वंशाचे कसे?

सुनक यांचे आजी-आजोबा पंजाबमधून पूर्व आफ्रिकेत स्थलांतरित झाले होते. ऋषीचे वडील यशवीर यांचा जन्म केनियामध्ये तर आई उषा यांचा जन्म टांझानियामध्ये झाला होता. 1960 मध्ये ऋषी यांचे आजी-आजोबा आपल्या मुलांसह ब्रिटनला आले. यशवीर हे वैद्यकीय क्षेत्रातील जनरल प्रॅक्टिशनर होते आणि आई फार्मासिस्ट होती. त्यांचा जन्म 1980 मध्ये हॅम्पशायरमधील साउथॅम्प्टन येथे झाला.

Advertisement

सुनक हे एका प्रसिद्ध भारतीय उद्योजकाचे जावई :

ऋषी सुनक हे मुळ भारतीय असून त्यांच्या पत्नीचा जन्म देखील भारतात झाला आहे. त्यांच्या पत्नी भारतातील सर्वात मोठी आयटी समूह कंपनी, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी आहे. ऋषी सुनक व अक्षता मूर्ती यांना दोन मुली आहेत.

Advertisement

दरम्यान, सुनक हे पंतप्रधान झाले तर ब्रिटनच्या इतिहासात अशी पहिली व्यक्ती असेल की भारतीय वंशाची असून ब्रिटनची पंतप्रधान झाली.

Advertisement