SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पाकिस्तानला दणका, ‘आयपीएल’साठी ‘आयसीसी’चा मोठा निर्णय..!!

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे.. ‘इंडियन प्रीमियर लीग’.. अर्थात ‘आयपीएल’च्या पुढील वर्षापासून (IPL- 2024) आता दोन नव्हे, तर अडीच महिने ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आपल्या ‘फ्युचर टूर प्रोग्राम'(FTP)मध्ये ‘आयपीएल’साठी अडीच महिन्यांचा कालावधी निश्चित केला आहे.

‘आयसीसी’च्या या निर्णयानुसार, दरवर्षी मार्चचा शेवटचा आठवडा ते जूनच्या पहिल्या आठवडा, असा तब्बल अडिच महिन्यांचा कालावधी ‘आयपीएल’साठी देण्यात आलाय. याआधी हा काळ मार्चअखेर ते मे अखेरपर्यंतचा होता, पण आता त्यात दोन आठवड्यांची वाढ करण्यात आली आहे..

Advertisement

इंग्लंडमधील बर्मिंगहॅममध्ये येत्या 25 व 26 जुलै रोजी ‘आयसीसी’ची वार्षिक बैठक होत आहे. त्यात ‘फ्युचर टूर प्रोग्राम’ची (आगामी कार्यक्रम) औपचारिक घोषणा केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

2024 पासून ‘आयपीएल’साठी अडीच महिन्यांचा कालावधी ठरवण्यात आला आहे. त्यामुळे या काळात ‘आयसीसी’कडून कोणतीही आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका खेळवली जाणार नाही. त्यामुळे ‘आयपीएल’साठी सगळ्या देशांचे खेळाडू उपलब्ध असणार आहेत.

Advertisement

पाकिस्तानी खेळाडूंना ‘आयपीएल’ खेळण्यावर बंदी घातलेली आहे. त्यामुळे पाकिस्तानकडून या प्रस्तावाला विरोध होऊ शकतो. मात्र, त्यांना इतर बोर्डांचे समर्थन मिळण्याची शक्यता कमीच आहे. कारण, ‘आयपीएल’मध्ये परदेशी खेळाडूंना सर्वाधिक रक्कम मिळते. शिवाय, खेळाडूंना मिळणाऱ्या रकमेतील 10 टक्के हिस्सा त्या देशाच्या क्रिकेट बोर्डांनाही मिळतो.. त्यामुळेच बहुतेक देश ‘आयपीएल’ दरम्यान मॅच खेळत नसल्याचे दिसते..

खेळाडूंची दमछाक होणार..!

Advertisement

2023-27 या काळातील नियाेजनात दोन जागतिक कसोटी चॅम्पियनशिप, टी-20 व वन-डे वर्ल्ड कप खेळला जाणार आहे.. शिवाय इतर देशांच्या मालिकांचाही समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, टी-20 लीग स्पर्धा असल्याने क्रिकेटचे वेळापत्रक खूपच व्यस्त असणार असल्याने खेळाडूंची दमछाक होणार आहे…

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement