SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): कामाच्या ठिकाणी तुमचा रूबाब राहील. तांत्रिक कामात चाल ढकल करू नका. गोड बोलून कार्यभाग साधावा. हाताखालील नोकरांचे सहकार्य मिळेल. काही अनपेक्षित बदल घडून येतील. अतिरिक्त खर्च वाढेल. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. कामात नवीन शिकायला मिळेल. आज तुम्हाला डोक शांत ठेवून विचारपूर्वक कृती करणे आवश्यक आहे. अचानक खर्च वाढू शकतो. घरात थोडे वादाचे वातावरण तयार होईल. मित्र मंडळीची गाठभेट होण्याची शक्यता आहे.

वृषभ (Taurus): वैचारिक सैरभैरता टाळावी. गृह शांती जपण्याचा प्रयत्न करावा. जोडीदारावर खर्च करावा लागेल. मतभिन्नता दर्शवून चालणार नाही. अती विचारात वेळ वाया घालवू नका. कामाच्या ठिकाणी सहकर्मचार्‍यांचे सहकार्य लाभेल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. मनावर नियंत्रण ठेवा. आर्थिक व्यवसायात पैशांचे व्यवहार जपून करा. घरातील वयोवृद्धांचा मान राखा. थोडा थकवा वाटेल पण आराम केल्यास उत्साहित वाटेल.

मिथुन (Gemini) : स्वतंत्र वृत्तीचे अवलोकन कराल. मुलांचे वागणे विरोधी वाटेल. मनाच्या चंचलतेवर मात करावी. साथीदाराचा विरह संभवतो. काळाची पावले ओळखून वागा. थकवा आणि चिंता वाढेल. व्यवसायात स्थैर्य प्राप्त होईल. विचारपूर्वक खर्च करा. आजचा दिवस तुम्हाला आनंदात घालवता येणार आहे. मित्रपरिवारासह वाद घालणे टाळा. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळेल. आई-वडिलांकडून साथ लाभेल.

कर्क (Cancer) : काही कठोर निर्णय घ्यावे लागू शकतात. हातातील कामे वेळेवर पूर्ण होतील. दिवसभर कामात गुंतून राहाल. चिकाटी सोडून चालणार नाही. पित्त विकाराचा त्रास संभवतो. सामाजिक कार्यात भाग घेण्याचा योग येईल. कामाच्या ठिकाणी सहकर्मचार्‍यांचे सहकार्य लाभेल. मन समाधानी राहील. जास्त पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. प्रिय व्यक्तीला वेळ द्या. कामाच्या बाबत हलगर्जीपणा करु नका.

Advertisement



सिंह (Leo) : भावंडांकडून त्रास संभवतो. आरोग्यात काही प्रमाणात सुधारणा होईल. कौटुंबिक खर्चाचा ताळमेळ जुळवावा. गरज नसेल तर प्रवास टाळवा. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. जोडीदाराचे प्रेम मिळेल. उत्पन्न स्थिर राहील. आरोग्यावर खर्च वाढेल. परिवारासंबंधित कामे पूर्ण करा. प्रकृतीकडे लक्ष द्या आणि वेळेवर आजाराचे निदान करा. जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीशी वाद घालणे टाळा.

कन्या (Virgo) : कामावरील त्रुटी कमी करण्याचा प्रयत्न करावा. दिवस आपल्याला अनुकूल आहे. कौटुंबिक खर्च वाढता राहील. आर्थिक कामे सुरळीत पार पडतील. इतरांना मनापासून मदत कराल. काही अपेक्षित कार्यात विघ्न येऊ शकतात. व्यवहार लाभदायक ठरतील. कायदेशीर अडचणी दूर होतील. विचारपूर्वक वागा. घरातील ताणतणामुळे त्रास होण्याची शक्यता आहे. मित्रपरिवारासह वेळ घालवा. तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज व्यायाम करा.

तुळ (Libra) : मित्रांची मोलाची मदत मिळेल. कामातील ताणतणाव दूर होईल. विरोधकांचा विरोध मावळेल. जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी. जुगार किंवा लॉटरीच्या फंदात पडू नका. धार्मिक कार्यात मन लागेल. प्रयत्नांना यश मिळेल. आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. मित्रपरिवारासह आदराने वागा. घरातील मंडळींची साथ लाभेल. विचारपूर्वक निर्णय घ्या. घरातील मंडळींचे विचार पटणार नाहीत. परंतु त्या विचारांचे पालन करुन योग्य ती कृती करा.

वृश्‍चिक (Scorpio) : जोडीदाराला वेळ द्यावा लागेल. मुलांबाबत काहीशी चिंता लागून राहील. अधिक कष्ट पडले तरी कामे पूर्ण होतील. कामात घाई-गडबड करू नका. कमिशन मधून चांगला लाभ होईल. रागावर नियंत्रण मिळेल. शुभवार्ता मिळेल. उत्पन्न वाढेल. आजचा दिवस उत्साहात जाईल. मित्र परिवारासह बाहेर जाण्यास वेळ काढा. कामे करताना घाईने निर्णय घेऊ नका. आई-वडिलांची साथ लाभेल. सरकारी कामाला गती येईल.

Advertisement



धनु (Sagittarius) : अधिकारी लोकांची तुमच्यावर मर्जी राहील. कामात स्त्री वर्गाचा हात लागेल. पत्नीच्या कमाईचा लाभ होईल. सहकार्‍यांशी जमवून घ्या. मित्रांकडून लाभाची शक्यता. नोकरीच्या ठिकाणी अधिकार वाढतील. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. उत्पन्न वाढण्याची शक्यता असेल. आज कंबर दुखी किंवा मानदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे झाल्यास दुर्लश्र करु नका. तसेच आजच्या दिवशी आराम केल्यास उत्तम.

मकर (Capricorn) : बदल लक्षात घेऊन वागावे. सामाजिक गोष्टींची जाणीव जागृत ठेवा. वादविवादात सहभागी होऊ नका. रेस, सट्टा यांतून लाभ संभवतो. हस्तकलेचे कौतुक केले जाईल. धोका पत्करण्याची वेळ येईल. धोका पत्करणे टाळा. घरात प्रसन्न वातावरण राहील. आज प्रेमप्रकरणी चुका होणार नाही याची दक्षता घ्या. घरातील मंडळींचे आदेश पाळा. ताणतणाव कमी करण्यासाठी स्वत:ला वेळ द्या.

कुंभ (Aquarious) : जोडीदाराची मर्जी सांभाळावी लागेल. गप्पांच्या ओघात गैरसमज वाढवू नका. प्रवासात सावधानता बाळगावी. कामापेक्षा इतर गोष्टींकडे कमी लक्ष द्या. हजरजबाबीपणा दाखवताना सावध रहा. घरात आणि कामाच्या ठिकाणीही तणाव असेल. आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात स्थैर्य प्राप्त होईल. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी कळेल.घरातील मंडळींशी आदराने वागा. पक्षांना अन्नदान करा.

मीन (Pisces) : क्षुल्लक गोष्टींवरून गैरसमज होऊ शकतात. इतरांची तुमच्याकडून मदतीची अपेक्षा राहील. घरगुती वातावरण प्रसन्न ठेवावे. मुलांच्या खोडकरपणाला आळा घालावा. निश्चयावर ठाम राहा. कामाच्या ठिकाणी चिंतेचे वातावरण राहील. व्यवहार करताना काळजी घ्या. बाहेर जाण्याचा योग येईल. आजचा दिवसाची सुरुवात उत्तम होणार नाही. परंतु काळजीपूर्वक कामे केल्यास चुका होण्याची शक्यता टळेल. आई-वडिलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या.

Advertisement