SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘जी-मेल’ वापरताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या, नाहीतर अकाऊंट होईल ‘बॅन’..!

जी-मेल… जगातील सर्वांधिक वापरली जाणारी ई-मेल सर्व्हिस.. कोट्यवधी लोक रोज ई-मेलच्या माध्यमातून संवाद साधतात, माहितीची देवाण-घेवाण करतात. बहुतांश लोक ई-मेल सेवा वापरतातच.. त्याचा मोठा फायदाही होत असल्याचे पाहायला मिळते..

अनेक जण ई-मेल (email) वापरत असले, तरी त्यातील बऱ्याच जणांना जी-मेल (gmail) वापराबाबतचे नियम माहिती नसतील. मात्र, या नियमांचं चुकून उल्लंघन झाल्यास तुमचं जी-मेल अकाउंट बंद होऊ शकतं. हे नियम नेमके कोणते आहेत, त्याचे पालन न केल्यास काय होतं, याबाबत जाणून घेऊ या..

Advertisement

जी-मेल वापरताना अशी घ्या काळजी..

ई-मेलची मर्यादित संख्या
सतत ई-मेल पाठवू नका.. जी-मेलने दैनंदिन ई-मेलच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा नियम लागू केला आहे. या नियमानुसार, तुम्ही रोज 500हून अधिक ई-मेल पाठवू शकत नाही. हे लिमिट क्रॉस केल्यास तुमचं खाते ‘बॅन’ केलं जाऊ शकतं.

Advertisement

‘स्पॅम मेसेज’बाबत काळजी घ्या
‘स्पॅम मेसेज’ (spam mail) पाठवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा संशय ‘गुगल’ला आल्यास, तुमचं अकाउंट काही काळासाठी ‘बॅन’ केलं जातं.. हा कालावधी एक तास ते 24 तास एवढा असू शकतो. वारंवार असा प्रयत्न केल्यास, तुमचं अकाउंट कायमचं बंद होऊ शकतं.

‘ई-मेल आयडी’ चेक करा
इनअ‍ॅक्टिव्ह ई-मेल आयडीवर बल्कमध्ये मेल पाठवल्यास ‘गुगल’कडून (google) तुमचे अकाउंट ‘रेड फ्लॅग’ केलं जातं. त्यामुळे ‘गुगल’चं अल्गोरिदम तुम्हाला ‘स्पॅमर’ समजेल व तुमचं अकाउंट ‘डिसेबल’ किंवा तात्पुरतं ‘बॅन’ होऊ शकतं.

Advertisement

तुम्ही चुकीच्या ई-मेलवर सतत मेल पाठवल्यास, ते मेल ‘बाउन्स’ होऊन परत तुमच्याकडे येतात. सतत असे झाल्यास, गुगल तुम्हाला ‘स्पॅमर’ समजतं. त्यामुळे कोणलाही मेल पाठवण्यापूर्वी ‘ई-मेल आयडी’ चेक करावा.

बेकायदेशीर कंटेंट पाठवू नका
ई-मेलद्वारे बेकायदा लिंक, फोटो, व्हिडिओ किंवा डॉक्युमेंट पाठवल्यास तुमचं खाते ‘बॅन’ केलं जाऊ शकतं. तसेच, ‘गुगल’च्या पॉलिसी विरुद्ध कोणतीही माहिती शेअर केल्यास, अशी कारवाई होऊ शकते. शस्रास्रांची खरेदी-विक्री, ड्रग्ज तस्करी, कॉपीराईट म्युझिक, व्हिडिओ किंवा चित्रपट आदींचा त्यात समावेश आहे.

Advertisement

दरम्यान, ‘गुगल’ कोणत्याही युजरचा ‘ई-मेल’ वाचत नाहीत. त्यासाठी कंपनीने ‘एआय डिटेक्शन’ फीचर विकसीत केलं आहे. ते ‘ई-मेल’मधील माहितीचं परीक्षण करतं, संशयित मेल्सबाबत सूचना देतं. बेकायदा ई-मेल पाठवण्याचा प्रयत्न केल्यास, ‘Error Message’ दाखवते..

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement