व्यवसाय करायची इच्छा आणि त्यादृष्टीने यशस्वी होण्यासाठी केलेले प्रयत्न पैसा कमवून देतात. कमी पगाराच्या नोकरीत आपण तात्पुरत्या गरजा भागविण्यासाठी कष्ट करतो पण हे पुरेसे नसते. पण जर तुम्ही तुमचा स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला तर तुम्ही स्वतःचं आणि कुटुंबाचं स्वप्न पूर्ण करून इतरांना देखील रोजगार देऊन अर्थव्यवस्थेला हातभार लावू शकता.
आज अशाच एका व्यवसायाबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारही मदत करणार आहे. पेपर नॅपकिन्स बनवण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग युनिट (Manufacturing unit) बसवून तुम्ही बंपर कमाई (Earn money) करू शकता. तुम्हाला बँकांकडून कर्जदेखील मिळेल. याद्वारे तुम्ही ‘पेपर नॅपकिन्स’ (paper napkins) तयार करण्यासाठी मोठा प्लँट उभारू शकत आणि व्यवसाय वाढवून पैसे कमवण्यासाठी सुरुवात करू शकता.
दरवर्षी वाढत चाललेल्या महागाईच्या दरामुळे विविध वस्तूंचा दर वाढत चालला तरी आपण काही वस्तू वापरणं सोडत नाही. त्याचप्रमाणे आजच्या बदलत्या जीवनशैलीत टिश्यू पेपर म्हणजेच पेपर नॅपकिन्सचा वापर बिझनेस, ऑफिसेस, हॉटेल, रेस्टॉरंट, फूड स्टॉल, ढाबा, कॅफे, चहा स्टॉल व्यावसायिक किंवा चार चाकी गाडी किंवा इतर मोठी वाहने असणारे लोक थांबवणार नाहीत. आता तर बेकरी, पान शॉप असणारे देखील कस्टरमरला स्टॅंडर्ड दाखवण्यासाठी पेपर नॅपकिन्सचा वापर करू लागले आहेत. सहसा हात आणि तोंड स्वच्छ करण्यासाठी टिश्यू पेपरचा वापर केला जातो.
गुंतवणूक, खर्च किती आणि कमाई..?
जर व्यावसायिक होण्याकडे वाटचाल करत असाल तर तुम्हाला पेपर नॅपकिन्स म्हणजे काय आणि ते वर सांगितल्याप्रमाणे कुठे कुठे वापरू शकतात आणि किती बाजारपेठ आपण मिळवू शकतो यासाठी आपल्या प्रॉडक्टची किती किंमत ठेवू शकतो आणि खर्च वजा करून फायदा किती राहील हा विचार करावाच लागेल.
मार्केटिंग स्ट्रॅटेजी-आयडिया काय काय वापरू शकता म्हणजे विक्रीचा खप वाढेल. असं सगळं एकदा अभ्यासून तुम्ही टिश्यू पेपरचे उत्पादन युनिट उभारायचे असेल तर कमीत कमी 3.50 लाख रुपये भांडवल उभारून प्लँट उभारू शकता. काही भांडवल खिशातून घालून आणि काही मुद्रा योजनेअंतर्गत बँकेत अर्ज करून आपल्या पात्रतेनुसार कर्ज मिळेल किंवा इतर बँकेतून बिझनेस लोन काढावे पण त्यामध्येही व्याजदर पाहून पर्याय निवडावा.
आता समजा, तुमच्याजवळ 3.50 लाख रुपये प्लँट उभारण्यासाठी लागतील. तुम्हाला बँकेकडून कर्ज किंवा वर्किंग कॅपिटल लोनदेखील मिळू शकते. ते आवश्यकतेनुसार घ्या. या प्लँटमध्ये एका वर्षात तुम्ही 1.50 लाख किलो पेपर नॅपकिन्स तयार करू शकता. तुम्ही बाजारपेठेनुसार दर ठेवा. अंदाजे 65 रुपये किलो दराने विक्री करू शकता. म्हणजेच तुम्ही एका वर्षात सुमारे 97.50 लाख रुपयांची उलाढाल करू शकता. तुम्हाला यातील खर्च वजा केल्यास वर्षाला सुमारे 10-12 लाख रुपयांची किंवा त्यापेक्षा अधिक कमाई होऊ शकते.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy