SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नगरपालिकानंतर आता ‘या’ निवडणुकाही स्थगित, ‘या’ कारणामुळे पुढे ढकलल्या..

राज्यातील 92 नगरपालिका व 4 नगरपंचायतींच्या निवडणुकांना नुकतीच राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकाही 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्याच्या सहकार विभागाने आज (ता. 15) हा निर्णय जाहीर केला..

गेल्या काही दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी झाली असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यातील पूर व आपत्कालीन परिस्थितीमुळे सहकार विभागाने राज्यातील सुमारे 8000 सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे..

Advertisement

पावसामुळे जनजीवन विस्कळित

सहकार विभागाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे, की “राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अहवालानुसार, राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे जनजीवन, वाहतूक व्यवस्था विस्कळित झालीय. आगामी काळात भारतीय हवामान खात्याने (IMD) अतिवृष्टीचा इशारा दिला आहे..”

Advertisement

राज्यातील परिस्थिती पूर्वपदावर येण्यास, मोठा अवधी लागणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांना निवडणुकीत सहभागी होता यावे, यासाठी राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका सध्या ज्या टप्प्यावर असतील, त्याच टप्प्यावर 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात येत असल्याचे सहकार विभागाने आपल्या आदेशात म्हटलं आहे.

मात्र, 250 किंवा त्यापेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था, तसेच, सर्वोच्च वा उच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेश दिलेल्या सहकारी संस्था या आदेशातून वगळण्यात आल्या आहेत. अशा सहकारी संस्थांच्या निवडणुका ठरल्याप्रमाणेच होणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आलेय..

Advertisement

ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुका या आदेशान्वये पुढे ढकलण्यात आलेल्या नाहीत, त्यांच्या निवडणुका शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करुन घेण्याबाबत कार्यवाही करावी, असंही सहकार विभागाने आपल्या आदेशात नमूद केलं आहे.

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement