SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

केंद्र सरकारकडून महागाईचा झटका; किराणातील ‘या’ गोष्टींवर आता जीएसटी कर

मुंबई :

देशभरात महागाई वाढल्याची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. कित्येक दिवसांपासून सातत्याने दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या आणि इतर गोष्टींच्या किंमती वाढताना दिसत आहेत. आता पुन्हा एकदा केंद्र सरकारने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारा निर्णय घेतला आहे. गुरुवारी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांमध्ये जीएसटीच्या कक्षेबाहेर असलेले ब्रँड नसलेले प्री-पॅक केलेले अन्नधान्य, डाळी आणि तृणधान्ये तसेच प्री-पॅक केलेले दही, बटर मिल्क आणि लस्सी यांच्यावर पाच टक्के कर लावण्याची घोषणा करण्यात आली आहे.

Advertisement

या सर्व गोष्टी स्थानिक किराणा दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात विकल्या जात असल्याने याचा परिणाम सर्वसामान्यांच्या थेट खिशावर पडणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात व्यापारी संघटनांनी उद्या देशभर संप पुकारला आहे. आम्ही व्यापारी संघटना या नात्याने या निर्णयाचा देशभरात निषेध करणार आहोत. या निर्णयाच्या विरोधात जीएसटी आयुक्तांना अनेक प्रश्न उपस्थित करत निवेदन देण्यात आलं आहे, अशी माहिती धान्य, तांदूळ आणि तेलबिया व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शरद मारू यांनी दिली. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे धान्य आणि डाळींच्या किमती 5 नव्हे तर 10 टक्क्यांनी वाढणार आहेत.

लहान दुकानदारांना रिटर्न भरण्यासाठी तज्ञांची नियुक्ती करणे आणि जीएसटी क्रमांक मिळाल्यावर त्यांना सेवा शुल्क भरावे लागेल असं देखील एका व्यापाऱ्याने सांगितलं आहे. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन(अमूल )चे मूल्य व्यवस्थापकीय संचालक आर एस सोधी यांनी टाइम्स ऑफ इंडियालाला माहिती देताना म्हटलं आहे की, 18 जुलैपासून 5 टक्के दर वाढणार आहेत.

Advertisement

छोट्या उत्पादनांमध्ये विक्रीचा व्हॉल्युम जरी जास्त असला तरी देखील नफ्याचे मार्जिन कमी आहे. यामुळे ई-वे बिलिंगचे ओझे वाढेल आणि छोट्या विक्रेत्यांना आता मासिक जीएसटी रिटर्न भरण्यासाठी तज्ज्ञांची नियुक्ती करावी लागेल आणि हे त्रासदायक आणि खर्चिक असणार आहे असं सोधी यांनी म्हटलं आहे.

Advertisement