SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मोठी बातमी! औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराच्या बाबतीत शिंदे सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीचे कोसळल्यानंतर राज्यात नव्याने शिंदे सरकार आले. शिंदे सरकार राज्यात येताच ठाकरे सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती देण्यात आली. यामध्ये आता ठाकरे सरकारने शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या नामांतराच्या निर्णायालादेखील नव्या शिंदे सरकारने स्थगिती दिली आहे. यामुळे हा उद्धव ठाकरे यांना जबर झटका मनाला जात आहे.

नामांतराला तूर्तास स्थगिती देण्याचे नेमके कारण काय?

Advertisement

मविआ सरकारने शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या नामांतराच्या निर्णयाला आता शिंदे सरकारने स्थगिती दिली आहे. औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव, तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे दि बा पाटील असं नामांतर करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. राज्यपालांनी बहुमत चाचणी सिद्ध करायचं पत्र दिल्यानंतर असा धोरणात्मक आणि लोकप्रिय निर्णय घेता येत नसल्याचा आक्षेप घेत या नामांतराला स्थगिती दिली असल्याचे सांगण्यात आले आहे.

मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होताना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने घेतलेले अनेक निर्णय रोखण्याचे आदेश शिंदे सरकारने दिले असून, मुख्यमंत्री या सर्व निर्णयांचा फेरआढावा घेणार असल्याचे
सांगितले आहे.

Advertisement

दरम्यान, या नामांतर मुद्यावरून एमआयएमचे नेते आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी कडकडून विरोध केला आहे.

Advertisement