SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 15 जुलै 2022 : सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

✒️ भारत vs इंग्लंड दुसरा वनडे सामना: भारताचा 100 धावांनी पराभव, इंग्लंडने भारताला 247 धावांचे लक्ष्य दिले असताना भारतीय संघ 38.5 षटकांत 146 धावांत ऑल आऊट

✒️ राज्यात पावसाचा जोर कायम; पुण्यासह अनेक जिल्ह्यांना 2 दिवस अतिवृष्टीचा इशारा तर अनेक ठिकाणी नद्यांना पूर आल्याने नागरिक व प्रशासनाला अलर्ट राहण्याचे आदेश

Advertisement

✒️ केंद्र सरकारकडून आजपासून ‘कोविड लस अमृत महोत्सव’ अंतर्गत 75 दिवस बूस्टर डोस मोफत; मनपा, शासकीय लसीकरण केंद्रांवर 30 सप्टेंबरपर्यंत मोफत डोस

✒️ श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी सिंगापूरहुन मेलद्वारे संसदेच्या अध्यक्षांना पाठवला पदाचा राजीनामा; श्रीलंकेत संसदेच्या सुरक्षेसाठी रणगाडे तैनात, कोलंबोत कर्फ्यू

Advertisement

✒️ पाेर्तुगालचा क्रिस्टियानाे राेनाल्डाे बनू शकतो सर्वाधिक पगार मिळवणारा फुटबाॅलपटू, साैदी अरबच्या एका क्लबकडून करारबद्ध हाेण्यासाठी 2400 काेटींची ऑफर

✒️ बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन वयाच्या 46 व्या वर्षी अडकणार लग्नाच्या बेडीत; फरार बिझनेसमन ललित मोदीसोबत करणार लग्न, तूर्तास डेटिंग करत असल्याचा ललित मोदीकडून खुलासा

Advertisement

✒️ डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया पुन्हा झाला कमकुवत, कालच्या व्यवहारात रुपया प्रति डॉलर घसरला 79.85 निच्चांकी स्तरावर

✒️ ‘कौन बनेगा करोडपती’चा पहिल्याच भागात सेलिब्रिटी गेस्ट होणार आमिर खान; सोबत करीना कपूर, मेरी काॅमही उपस्थित राहणार

Advertisement

✒️ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची आज भेट होणार, राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी सकाळी 11 वाजता भेटीची शक्यता

✒️ मिताली राज च्या जीवनावर आधारित चित्रपट ‘शाबाश मिठू’ आज रिलीज होणार, तर पंचायत फेम जितेंद्र कुमारचा जादूगर हा सिनेमा नेटफ्लीक्सवर रिलीज होणार
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement