SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

एलॉन मस्क विरुद्ध ट्विटर संघर्ष पेटणार; आता होणार कायदेशीर लढाई

एलॉन मस्क हे टेस्ला आणि स्पेसेक्स कंपनीचे मालक आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. नुकतंच एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी करण्याची घोषणा केली होती. मात्र नंतर ही डील कॅन्सल करण्यात आली आणि डील कॅन्सल करताना एलॉन मस्क यांनी ट्विटर कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. ट्विटरने फेक अकाउंट बाबत डेटा देण्यात नकारात्मक भूमिका घेतल्याने ही डील आम्ही कॅन्सल करत आहोत असं देखील एलॉन मस्क यांनी म्हटलं होतं. ट्विटरवर एलॉन मस्क यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर आता ट्विटरनं देखील मस्क यांच्या विरोधात कडक भूमिका घेण्याची तयारी दर्शवली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, ट्विटर कंपनी एलॉन मस्क यांना आता कोर्टात खेचणार आहे. एलॉन मस्क यांनी ट्विटरवर केलेले आरोप हे अत्यंत गंभीर असल्याने ट्विटरने ही भूमिका घेतली आहे. ट्विटरनं न्यूयॉर्कमधील टॉप लॉ फर्म Wachtell, Lipton, Rosen & Karz LLP ची या लढाईसाठी नियुक्ती केली आहे. ट्विटर कंपनी पुढील आठवड्यात डेलावेअर येथे मस्क यांच्याविरोधात खटला भरणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. ट्विटरच्या या आक्रमक भूमिकेनंतर मस्क यांनी देखील कायदेशीर लढाईसाठीची तयारी केली आहे.

Advertisement

एलॉन मस्क यांनी ट्विटर विरोधातील या खटल्यासाठी Quinn Emanuel Urquhart & Sullivan या लॉ फर्मची नियुक्ती केली आहे. एलॉन मस्क यांनी शुक्रवारी मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर विकत घेणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. ट्विटरसोबत त्यांचा 44 अब्ज डॉलरचा करार देखील खरेदीवेळी करण्यात आला होता. मात्र हा करार देखील रद्द करण्यात आला आहे. करार रद्द करत असताना मस्क यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे आता ट्विटर विरुद्ध एलॉन मस्क अशी लढाई होणार आहे.

Advertisement