SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. मन आनंदी व आशावादी राहील. कामात मन गुंतवण्याचा प्रयत्न करावा. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. सामाजिक क्षेत्रात लाभ प्राप्तिचा योग. जीवनात जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. आज कचेरीची कामे मनाजोगी पार पडतील. आज नवीन प्रयोग कराल.

वृषभ (Taurus): मुलामुलींचे प्रश्‍न निर्माण होतील. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. नवीन लोकांशी संपर्क होईल. नोकरीच्या ठिकाणी कामे सुरळीत पार पडतील. अति श्रमाचा ताण जाणवेल. कागदपत्रे नीट तपासून घ्या. आजचा दिवस आपल्यासाठी शुभ आहे. पुण्य करा.

मिथुन (Gemini) : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. ज्या लोकांनी कुठे गुंतवणूक केली होती आजच्या दिवशी तुम्हाला आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. जिद्द व चिकाटी वाढेल. आवडीच्या गोष्टींना वेळ मिळेल. मित्रांशी मतभेद होण्याची शक्यता. गावातील धार्मिक कामात हातभार लावाल.

कर्क (Cancer) : व्यवसायात वाढ होईल. संततिसौख्य लाभेल. मित्रमंडळी मदतीसाठी तत्पर असतील आणि आपणास खरा आधार देतील. गूढ कार्यात यश प्राप्ति. प्रगतीसाठी मेहनत कराल. गोडीने कामे साधून घेण्याचा प्रयत्न करावा. ऑफिसमधील किंवा घरातील आर्थिक कामे सावधानतेने करावीत.

Advertisement



सिंह (Leo) : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल. वेळेवर सचेत राहणे तुमच्यासाठी उत्तम असेल. भावनिक धोका पत्करणे लाभदायक ठरेल. आज भाग्य तुम्हाला साथ देईल. गप्पा मारण्यात अधिक वेळ घालवाल. क्षणिक आनंदाने खुश व्हाल.

कन्या (Virgo) : शत्रुपीडा नाही. नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. इतरांवर तुमची उत्तम छाप पडेल. सामाजिक क्षेत्रात धार्मिक अनुसंधानाचा योग. गोड शब्दातून संवाद साधावा. कामातून चांगले समाधान मिळेल. हातातील कामात यश येईल.

तुळ (Libra) : व्यवसायातील आर्थिक निर्णय मार्गी लागतील. आध्यात्मिक गोष्टींकडे कल वाढेल. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. विरोधक बदनाम करण्याचा प्रयत्न करू शकतात. व्यवसायानिमित्त प्रवास घडेल. अचानक धनलाभाच्या घटना घडतील. कामात अधिक कष्ट पडतील.

वृश्‍चिक (Scorpio) : नवी दिशा, नवा मार्ग सापडेल. दुपारनंतर कामे रखडण्याची शक्यता. व्यवसायात लाभदायक परिस्थिती राहील. व्यावसायिकांनी प्रामाणिकपणे काम करावे. तुमच्या व्यक्तिमत्वावर लोक खुश होतील. दिवस चांगल्या कमाईचा असेल, म्हणून अधिक कष्ट करा.

Advertisement



धनु (Sagittarius) : निर्णय योग्य ठरतील. काहींना प्रवासाचे योग येतील. नोकरीत वरिष्ठांकडून प्रशंसाही मिळेल. प्रमोशनही होऊ शकते. प्रकल्प संशोधनावर काम करू शकता. मनमोकळ्या गप्पा मारल्या जातील. तुमच्यातील साहस वाढेल. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवा.

मकर (Capricorn) : दुपारनंतर आर्थिक लाभ होतील. प्रवास शक्यतो टाळावेत. तरुणांना कायमस्वरूपी नोकरीच्या प्रयत्नात यश मिळेल. लोकांमध्ये सन्मान मिळेल. मनाच्या चंचलतेला आवर घालावी. जोडीदाराच्या शब्दाला प्रमाण मानावे लागेल. पतीच्या कमाईत वाढ होईल. सुंदर मनाची माणसं भेटीला येतील.

कुंभ (Aquarious) : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा. आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ द्या. नोकरीच्या क्षेत्रात चांगली कामगिरी कराल. नवीन अधिकार सावधानतेने वापरा. इतरांवर अधिक विसंबून राहू नका, तोटा होईल.

मीन (Pisces) : तुम्ही सर्वांची काळजी करता हे घरातील लोकांना जाणवू द्या. चांगला वेळ मुलांबरोबर व्यतीत करा. त्यांना तक्रार करायला वाव ठेऊ नका. काही बाबींमध्ये तणाव कमी होईल. भावंडांना मदत करावी लागेल. भागिदारीतून लाभ होईल. कामाला चांगली गती येईल.

Advertisement