SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मारुती सुझुकीची ‘ही’ लोकप्रिय कार होणार बंद

मुंबई :

गेल्या काही दिवसांपासून ऑटो क्षेत्रात लोकप्रिय गाड्या बंद करण्याचे निर्णय विविध कंपन्यांनी वेगवेगळ्या कारणांनी घेतले. अशातच महागाईमुळे लोकांनीही स्वस्तात मस्त अशा गाड्यांना पसंती दिली आहे. मारुतीच्या गाड्या मायलेज जास्त असल्याने खूप लोकप्रिय आहेत. मात्र अशातच आता मारुती सुझुकीनेही एक मोठा निर्णय घेतला आहे. स्वस्तात मस्त अशा एस्प्रेसोला (SPresso) कंपनीने कायमचा ब्रेक लावला आहे.(Maruti Suzuki SPresso Variants Discontinued) मायक्रो एसयूव्ही म्हणून बाजारात आणल्या या कारच्या अनेक प्रकारांची विक्री थांबवण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.

Advertisement

SPresso ही गाडी मधल्या काळात लोकप्रिय झाली असली तरी गेल्या काही दिवसांपासून या गाडीचा खप एकदम कमी झाला आहे. आणि याच कारणामुळे कंपनीने हा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे.

ही गाडी suv डिझाइन पण कार कॅटेगरी मध्ये मोडणारी होती. भारतात असा प्रयोग पहिल्यांदाच झाला होता. मात्र मारुतीच्या इतर गाड्यांमध्येही या एस प्रेसो गाडीसारखे फीचर्स असल्याने लोकांनी या गाडीला नंतरच्या काळात कमी पसंती दिली.

Advertisement

स्टँडर्ड, LXI, LXI CNG, VXi, VXi AMT (VXI MT) आणि VXi. CNG ( VXI CNG). एस प्रेसोचे हे सगळे प्रकार मारुतीने बंद केले आहेत. हे प्रकार बंद केल्यानंतर एस्प्रेसोच्या स्टँडर्ड (O) प्रकाराला त्याचे बेस मॉडेल म्हटले जाईल. यासोबतच कंपनी पर्यायी पॅकेज अंतर्गत उपलब्ध VXI+(0) या टॉप व्हेरियंटची विक्री देखील सुरू ठेवेल.

एस प्रेसो या गाडीची विक्री अचानक कमी झाली नाही. गेल्या काही महिन्यांपासून खप कमी होण्याचे प्रमाण वाढले. गेल्या एका आर्थिक वर्षात एस्प्रेसोच्या 64,000 युनिट्सची विक्री झाली आहे. कंपनी दर महिन्याला या एसयूव्हीच्या सुमारे 5300 युनिट्सची विक्री करते. परंतु जून 2022 मध्ये या वाहनाची विक्री केवळ 652 युनिट्सवर आली.

Advertisement