SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टी-20 संघाची घोषणा, ‘या’ खेळाडूंना विश्रांती..!!

इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय संघ तेथूनच वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर रवाना होणार आहे.. वेस्ट इंडिज दौऱ्यात 3 सामन्यांची वन-डे मालिका व नंतर 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे.. वन-डे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आज (ता. 14) टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर करण्यात आली..

वेस्ट इंडिजचा हा दौरा येत्या 22 जुलैपासून सुरु होणार आहे.. त्यात सुरुवातीला वन-डे मालिका होईल.. त्यानंतर 29 जुलैपासून टी-20 मालिका सुरु होणार आहे.. या मालिकेतही ‘बीसीसीआय’ने आपल्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतलाय..

Advertisement

वन-डे मालिकेसाठी शिखर धवन हा कर्णधार असून, रवींद्र जाडेजाला उपकर्णधार करण्यात आले आहे.. या मालिकेसाठी नियमित कॅप्टन रोहित शर्मासह विराट कोहली, जसप्रीत बुमराह या स्टार खेळाडूंना विश्रांती दिली होती. मात्र, टी-20 मालिकेसाठी रोहित उपस्थित असेल.. मात्र, विराट व बुमराह यांना टी-20 मालिकेसाठीही विश्रांती देण्यात आलीय…

इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतही विराटला खास कामगिरी करता आली नव्हती. नंतर त्याला टी-20 संघातून वगळण्याची मागणी होत होती. त्यात तो सतत विश्रांती घेत असल्यानेही अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी त्याला ‘बीसीसीआय’ (BCCI) ने पुन्हा एकदा विश्रांती दिली आहे.

Advertisement

टी-20 संघात के. एल. राहुल व फिरकी गोलंदाज कुलदीप यादव यांचे पुनरागमन झाले आहे.. दुखापतीमुळे हे दोन्ही खेळाडू भारतीय संघापासून दूर होते.. आता संघात त्यांची निवड झाली असली, तरी फिटनेस टेस्टनंतरच त्यांचा भारतीय संघात समावेश केला जाणार असल्याची माहिती ‘बीसीसीआय’ने दिली.

भारताचा वन-डे संघ- शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, शुबमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, शार्दूल ठाकूर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग.

Advertisement

भारताचा टी-20 संघ- रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर. अश्विन, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रक

Advertisement

वन-डे मालिका

  • 22 जुलै – पहिली वन डे
  • 24 जुलै – दुसरी वन डे
  • 27 जुलै – तिसरी वन डे (सर्व सामने पोर्ट ऑफ स्पेनमध्ये भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता)

ट्वेंटी-20 मालिका

Advertisement
  • 29 जुलै – पहिला ट्वेंटी-20 सामना – पोर्ट ऑफ स्पेन
  • 1 ऑगस्ट – दुसरा ट्वेंटी-20 सामना – सेंट किट्स आणि नेव्हिस
  • 2 ऑगस्ट – तिसरा ट्वेंटी-20 सामना – सेंट किट्स आणि नेव्हिस
  • 6 ऑगस्ट – चौथा ट्वेंटी-20 सामना – फ्लोरिडा
  • 7 ऑगस्ट – पाचवा ट्वेंटी-20 सामना – फ्लोरिडा (सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता)

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement