SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

महाराष्ट्रावर दुहेरी संकट : कोरोनानंतर आता ‘या’ आजाराने वाढवली राज्याची चिंता!

मुंबई : मागील काही दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याचे वाटत असताना राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. एकीकडे कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असताना आता नागरिकांची चिंता वाढवणारी आणखी एक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात आता झिका विषाणूची एन्ट्री झाली आहे.

पालघर जिल्ह्यातील जोई येथील आश्रमशाळेतील 7 वर्षांच्या मुलीला झिका विषाणूची लागण झाली आहे. गेल्या वर्षी पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे 50 वर्षांच्या महिलेला झिका व्हायरसची लागण झाली होती. राज्यासाठी ही चिंतेची बाब असून पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Advertisement

एडीज डासांमुळे झिका विषाणूचा संसर्ग होतो. व एडीज डासांमुळेच डेंग्यू आणि चिकनगुनिया विषाणू देखील पसरतो. झिका विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीचे रक्त पिल्याने या झिका विषाणूची लागण होत असल्याचे सांगण्यात येते आहे.

या आजाराची लक्षणे कोणती?
▪️ विषाणूची लागण झाल्यास ताप येणे.
▪️ अंगदुखीचा त्रास.
▪️ डोकेदुखीचा त्रास.
▪️ डोळे येणे, डोळ्याची जळजळ होणे.
▪️ अंगावर पुरळ उठणे.
▪️ स्नायू दुखणे.
▪️ मळमळ आणि उलटी होणे.
▪️ सांधेदुखी अशी व इत्यादी लक्षणे आढळतात.

Advertisement

दरम्यान, झिका व्हायरसचे लक्षण दिसल्यास त्वरित तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

Advertisement