SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, राज्यात पेट्रोल-डिझेल ‘एवढ्या’ रुपयांनी स्वस्त..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्यांना दिलासा मिळावा यासाठी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरकपातीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यामुळे महागाईने त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

राज्यातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होताना दिसत आहे. कारण आज राज्य सरकारने व्हॅट करात कपात केली आहे. त्यामुळे राज्यात पेट्रोल 5 रुपये तर, डिझेल 3 रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे महागाईतून सामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. पेट्रोल डिझेलचे दर कमी झाल्यामुळे इतर वस्तूंचे दर कमी होण्यासही येत्या काळात मदत होईल.

Advertisement

अनेक राज्यांनी पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर व्हॅट कमी केला होता. मात्र महाराष्ट्रात याबाबत निर्णय घेण्यात आला नव्हता. देशातील अनेक राज्यांनी दर कपात केली होती. मात्र महाविकास आघाडी सरकारने केली नव्हती. तसेच आता राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर लगेचच विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करुन सर्वसामान्यांना दिलासा देणार असल्याचा शब्द दिला होता.

केंद्र सरकारने एक्साईज ड्युटी कमी केल्यानंतर राज्य सरकारने व्हॅट कमी करावा अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व राज्यांना केली होती. आता महाराष्ट्र सरकारने देखील राज्याच्या करात कपात केली आहे. आता या कर कपातीमुळे राज्याच्या तिजोरीवर सहा हजार कोटींचा बोझा पडणार आहे. ही तूट भरून काढण्यासाठी कोणत्याही विकासकामाच्या खर्चाला कात्री लावणार नसल्याचं देखील राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement