SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

केंद्र सरकार देणार 5 हजार रुपये? कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले, मग वाचा..

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे आणि देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 4 कोटींवर पोहोचला असून मागील 24 तासांमध्ये 16,906 नवे कोरोना रुग्ण वाढले आहेत, तर 45 जणांचा मृत्यू झाला आहे. पण सध्या सोशल मीडियामध्ये काही न काही मेसेज व्हायरल होत असतात. अनेक लोक सगळ्याच मेसेजमधील ऑफर्स, दावे आणि व्हिडिओ खरं आहे असं समजून चालतात. म्हणून खोट्या मेसेजचा पूर आला आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 5,25,519 लोकांचा बळी गेला आहे. देशातील आतापर्यंत करोडो लोकांनी कोरोनाची लस कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत आणि आता सरकारने बूस्टर डोस देण्याची तयारी केली आहे. असं असताना सोशल मीडियावर तुम्ही असाच एक मेसेज वाचला असेल, जो जोरदार व्हायरल होत आहे.

Advertisement

कोरोना लस घेणाऱ्यांना ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर प्रधानमंत्री जन कल्याण विभागमार्फत 5,000 रुपये मिळणार असल्याचा दावा केला जात आहे. त्या व्हायरल मेसेजमध्ये असा दावा केला आहे की, ज्या लोकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांना केंद्र सरकारकडून 5,000 रुपये दिले जाणार असल्याचा दावा केला आहे. यासोबतच या व्हायरल मेसेजमध्ये फसवणुक करता यावी यासाठी एक लिंकही शेअर करण्यात आली आहे. लोकांना त्या लिंकवर क्लिक करून वैयक्तिक माहिती भरावी लागेल आणि मग त्यांना 5 हजार रुपये मिळतील, असे या मेसेजमध्ये असेल. त्यासाठी 30 जुलै 2022 ची मुदतदेखील दाखवण्यात आली आहे.

पीआयबीच्या ट्विटर अकाऊंटवरून स्पष्टीकरण..

Advertisement

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या हा मेसेज खरा आहे की खोटा यावर सरकारने स्पष्टीकरण दिलं आहे. पीआयबीच्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती देण्यात आली आहे. पीआयबी फॅक्ट चेक ट्विटर अकाऊंटवर दिलेल्या माहितीनुसार हा मेसेज खोटा आहे. अशा मेसेजपासून सावध राहा, अन्यथा आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. असे मेसेज फॉरवर्ड करू नका.

PIB Fact Check सरकारच्या पॉलिसी/स्कीम्स/विभाग/मंत्रालयं यासंदर्भातील चुकीच्या सूचनांचा लोकांमध्ये प्रसार होऊ नये यावर काम करते. देशातील कोणतीही व्यक्ती PIB Fact Check ला संशयास्पद बातमीचा किंवा पोस्टचा स्क्रीनशॉट, ट्वीट, किंवा फेसबुक पोस्ट 918799711259 या WhatsApp क्रमांकावर किंवा [email protected] या मेल आयडीवर मेल करून माहिती देता येऊ शकेल.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement