SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

राज्यातील शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय; आता ‘या’ दिवशी होणार परीक्षा

मुंबई : राज्यात सध्या पावसाची दमदार बँटिंग सुरु असताना पुढील 48 तासांत राज्यात जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई, कोकण, पुणे, नाशिकसह काही जिल्ह्यांना तर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

एवढेच नव्हे तर सध्या राज्यातील अनेक भागातील शाळा देखील पावसामुळं बंद ठेवण्यात आल्या आहे. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं मोठा निर्णय घेतला असून 20 जुलै रोजी होणाऱ्या इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा राज्यातील अतिवृष्टीच्या परिस्थितीमुळे पुढे ढकलली आहेत.

Advertisement

राज्यात इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा या राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेतल्या जात असून राज्यातील 5707 परीक्षा केंद्रांवर या परीक्षा एकाच दिवशी घेतल्या जाणार होत्या. मात्र राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये होत असलेली अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे धकलण्यात आली असून ही परीक्षा आता 31 जुलै रोजी राज्यभर घेतली जाणार आहे.

राज्यातील एवढे विद्यार्थी देणार ही परीक्षा :-

Advertisement

राज्यामध्ये या परीक्षा केंद्रावर 7.21 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यामध्ये इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीसाठी 4 लाख 17 हजार 894, तर इयत्ता आठवी शिष्यवृत्तीसाठी 3 लाख 3 हजार 697 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

Advertisement