SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

राज्यातील ‘या’ विभागांतर्गत 4,675 जागा रिक्त; वाचा ही महत्वाची माहिती

दररोज अनेक शहरात, अनेक चौकात तसेच रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असताना वाहतूक पोलिस कुठे असतात, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नाचे कारण म्हणजे देशातील वाहतूक पोलिसांच्या विभागाअंतर्गत तब्बल 29 हजार 642 पदे रिक्त आहेत. यामध्ये प्रामुख्याने पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक व इतर अनेक राज्यात वाहतूक पोलिसांच्या जागा रिक्त आहेत.

ब्युरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या अहवालानुसार, देशात तब्बल 29 टक्के वाहतूक पोलिसांच्या जागा रिक्त असून देशभरात वाहतूक पोलिसांच्या एकूण जागा या 1 लाख 02 हजार 929 इतक्या आहेत. तर यापैकी देशभरात सध्या 73,287 वाहतूक पोलिस तैणात असून 29 हजार 642 पदे रिक्त आहेत. म्हणजेच, देशभरात वाहतूक पोलिसांच्या 29 टक्के जागा रिक्त आहेत. यामध्ये पश्चिम बंगालमध्ये व महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रमाण असून ते सरासरी बंगालचे 51 टक्के तर महाराष्ट्राचे 33 टक्के इतके आहे.

Advertisement

दरम्यान, महाराष्ट्रात वाहतूक पोलिसांच्या एकूण जागा 14,290 इतक्या असून यापैकी 9,615 पोलिस तैणात आहेत. तर 4,675 जागा अद्याप रिक्त आहेत. या रिक्त पदांची भरती कधी होणार याबाबत अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही

Advertisement