SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता व्हॉट्सअ‍ॅपवर सेंड झालेला मेसेज देखील करू शकता एडिट; जाणून घ्या निन्जा टेक्निक

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने व्हॉट्सअ‍ॅपमध्ये नव-नवीन फीचर्स येत आहेत. आता कंपनी व्हॉट्सअ‍ॅपमध्ये लवकरच एडिट बटण हे फीचर देणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या बीटा व्हर्जनमध्ये एडिट बटणाची टेस्टिंग सुरु असून सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर कोणतेही एडिट बटण नाही. तसेच, सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर फक्त पाठवलेले मेसेज डिलीट करता येऊ शकतात, पण एडिट केले जाऊ शकत नाहीत. मात्र या आगामी फीचरमुळे यूजर्स पाठवल्यानंतर मेसेज एडिट करू शकतील.

WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅप मेसेज रिअॅक्शन फीचरनंतर आता व्हॉट्सअ‍ॅप टेक्स्ट मेसेज एडिटिंग फीचर देत आहे. जे आगामी अपडेटसह सादर केले जाऊ शकते. WABetaInfo ने याबाबत एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. त्यामध्ये असे दिसते की, व्हॉट्सअ‍ॅप एक नवीन ऑप्शन विकसित करत असून त्याच्या मदतीने तुम्ही मेसेज एडिट करू शकता.

Advertisement

सोबतच या फिचरच्या मदतीने युजर्स मेसेज पाठवल्यानंतरही त्यांची चूक सुधारू शकतील. परंतु हे फीचर सध्या विकसित केले जात असून त्यामुळे याचा अर्थ असा होतो की, आगामी काळात काही बदल देखील होऊ शकतात. याचबरोबर, व्हॉट्सअ‍ॅप हे फीचर सर्व अँड्रॉइड बीटा, आयओएस बीटा आणि डेस्कटॉपसाठी काम करणार आहे असे समजते. मात्र, या फीचरबद्दल अधिक माहिती मिळालेली नाही.

Advertisement