SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पावसाचं थैमान! राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात ‘एवढी’ वाढ, कुठे अलर्ट वाचा..

राज्यभरात मागील आठवडाभरापासून सतत रिपरिप पडणाऱ्या पावसामुळे लोकांची दिवसभरातील कामे खोळंबली तर शेतात पाणी साचल्याने शेतकऱ्यांनाही मोठे नुकसान होत आहे. देशासह राज्यात अनेक नद्यांना पूर (Maharashtra Flood) आल्याने लोकांच्या घरात पाणी घुसले आहे तर राज्यात अनेक मृत्यू देखील झाले आहेत.

राज्यभर पावसाचा जोर वाढला असून मुंबईसह अनेक भागांत जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली जातेय. किनारपट्टीवर लाटांची उंची आज आणखी वाढण्याची शक्यता असल्याने यांसह इतर भागांतही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून सततच्या पावसामुळे, अतिवृष्टीमुळे राज्यामध्ये धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. काही धरणं, तलाव ओव्हरफ्लो झाली आहेत.

Advertisement

पुणे: पुणे जिल्ह्यात पडणाऱ्या संततधार पावसामुळे खडकवासला धरणामध्ये (Khadakwasla Dam) क्षमतेच्या 100 टक्के पाणीसाठा झाला आहे. धरण क्षेत्रात पडणाऱ्या पावसाचा अंदाज लक्षात घेऊन 11 तारखेच्या मध्यरात्रीपासून पाण्याचा विसर्ग चालू करण्यात आला आहे. सुरुवातीला सुमारे 1000 क्युसेक पाणी सोडण्यात आलं होतं.

अहमदनगर: अहमदनगरमधील भंडारदरा आणि निळवंडे (Bhandardara and Nilwande Dam) दोन्ही धरण 50 टक्के भरली आहेत. तर अहमदनगर जिल्ह्यातील मुळा धरण 43% भरले आहे. आज ते निम्मे भरण्याच्या मार्गावर असेल तसेच काही प्रमाणात विसर्ग देखील सुरू आहे. इतर ठिकाणी अनेक छोटी धरण ओव्हरफ्लो झाले आहेत.

Advertisement

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील वाघाड धरण (Waghad Dam Nashik) काही दिवसांपासून चालू असलेल्या संततधार पावसामुळे ओव्हरफ्लो झालं आहे. जिल्हा प्रशासनाकडून नाशिकसारख्या शहरात गोदावरी नदीच्या पातळीत वादळ झाल्यानं हाय अलर्ट दिला गेला आहे. दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड (ozarkhed dam) धरणसुद्धा ओव्हरफलो झालं आहे.

नंदुरबार: खान्देशमधील नंदुरबार जिल्ह्यात मागील 48 तासांत जोरदार पाऊस झाल्याचं पाहायला मिळालं. नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वीरचक्र धरणाच्या (Nandurbar VeerChakra Dam) पाणीसाठ्यात आता मोठी वाढ झाली आहे.

Advertisement

धुळे: धुळ्याला पाणीपुरवठा करणाऱ्या अक्कलपाडा धरणातील (Nandurbar Akkalpada Dam) पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

सांगली: पावसाळ्यात सुरुवातील अति पाऊस होऊन धोक्याची पातळी ओलांडणारी नदी म्हणून ज्या नदीचं नाव घेतलं जातं अशा सांगलीच्या कृष्णा नदीची पाणीपातळी वाढल्याने चांदोली धरण (Chandoli Dam) पन्नास टक्क्यांहून अधिक भरलं आहे. विदर्भात चंद्रपूर जिल्ह्यातील इरई धरणाचे (Chandrapur Irai Dam) 4 दरवाजे उघडण्यात आले आहेत.

Advertisement

Mumbai Water Dam: मागील काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुढच्या वर्षापर्यंत मुंबईला पाणी कपातीचं टेन्शन नाही. कारण मुंबईच्या तलावांत 50 % पेक्षा जास्त पाणीसाठा पुढील 189 दिवस म्हणजेच पुढील वर्षाच्या 16 जानेवारी 2023 पर्यंत पुरेल एवढा झाला आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावात गेल्या 18 दिवसांत मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे तलावातील पाणीसाठ्यात 5,86,899 दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची वाढ झाली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement