मुंबई :
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता महत्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय नौदलात अग्निपथ योजनेअंतर्गत आता भरती होणार आहे. अग्नीवर योजनेची घोषणा केल्यानंतर भारतात बऱ्याच राज्यांमध्ये गदारोळ झाला होता. मात्र वायुदल आणि नौदलाने अग्नीवर योजनेअंतर्गत आता भरतीची थेट घोषणा केली आहे.
भारतीय नौदल म्हणजेच इंडियन नेव्हीने अग्निविर योजनेनंतर्गत भरती प्रक्रिया सुरु केली असून joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाईटवर या भरतीची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. 15 जुलै 2022 पासून भारतीय नौदलातील पदांसाठी अर्ज मागवण्यात येणार आहे.
22 जुलै ही अर्ज भरण्यासाठीची शेवटची तारीख आहे. ही भरती प्रक्रिया सिनियर सेकेंडरी रिक्रूट(SSR) अंतर्गत केली जाणार आहे. भारतीय नौदलाने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार नौदलात अग्निविरांच्या 2800 पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी केवळ आणि केवळ अविवाहित उमेदवारच अर्ज करू शकतात. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळाकडून गणित आणि भौतिकशास्त्र विषयांसह बारावी उत्तीर्ण केलेली असणं अनिवार्य आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 1 नोव्हेंबर 1999 ते 30 एप्रिल 2005 दरम्यान झालेला असावा. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी पुरुष उमेदवारांची किमान उंची 157 सेमी आणि महिला उमेदवारांसाठी 152 सेमी निश्चित करण्यात आली आहे.
अग्निविरांच्या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 30 हजार रुपये प्रारंभिक वेतन दिलं जाणार असल्याची अधिसूचनेत नमूद करण्यात आलं आहे. बारावीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे या पदांच्या भरतीसाठी उमेदवार निवडले जाणार आहेत. त्यानंतर लेखी चाचणी आणि शारीरिक चाचणीसाठी बोलवलं जाणार आहे