भारतीय चलनात नाण्यांना एक वेगळं महत्व आहे.. आतापर्यंत भारत सरकारने सातत्याने नवनवी नाणी सादर केली आहेत नि त्याला लाेकांचाही चांगला प्रतिसाद मिळालेला आहे.. विशेषत: सुट्ट्या पैशांवर ही नाणी चांगला उपाय ठरलीत.. मात्र, बऱ्याचदा अफवांचाही या नाण्यांना फटका बसलाय…
सध्या भारतीय चलनात 1, 2, 5 व 10 रुपयांची नाणी वापरली जातात.. मात्र, आता आणखी एका नाणे येतंय. भारतात लवकरच 175 रुपयांचे नाणे जारी केले जाणार आहे.. वाचून आश्चर्याचा धक्का बसला ना..! पण हो, हे खरंय.. लवकरच 175 रुपयांचे नाणे पाहायला मिळू शकते.. नेमकं हे नाणे कसे असेल, याबाबत जाणून घेऊ या…
भारतात जारी केलं जाणारे 175 रुपयांचे नाणे इतर नाण्यांसारखे नाही.. हे स्मारक नाणे असणार आहे.. उत्तराखंडमधील रुरकी येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या स्थापनेला 175 वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्त मोदी सरकार हे 175 रुपयांचे खास नाणे जारी करणार आहे. नाण्यांचा अध्ययन करणारे सुधीर लुनावत यांनी ही माहिती दिली.
कसं असेल हे नाणे..?
भारत सरकारद्वारे जारी केल्या जाणाऱ्या 175 रुपयांच्या नाण्याच्या एका बाजूला ‘अशोक स्तंभा’च्या खाली ‘सत्यमेव जयते’ व ‘₹’ ही चिन्हे असतील. सोबत 175 लिहिलेले असेल. उजवीकडे व डावीकडे हिंदी व इंग्रजीत ‘रुपये’ आणि ‘भारत’ लिहिलेलं असेल. नाण्याची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे :
- 35 ग्रॅम वजन
- 50 टक्के चांदी
- 40 टक्के तांबे
- 5 टक्के निकेल
- 5 टक्के जस्त
- 44 मिमी गोलाकार
भारत सरकारने याआधीही वेगवेगळ्या कारणांनी 60 रुपये, 75 रुपये, 125 रुपये, 150 रुपये, 250 रुपये, 350 रुपये, 400, 500, 550, तसेच 1000 रुपयांची नाणे जारी केली आहेत. त्याच पद्धतीने आता 175 रुपयांचे हे स्मारक नाणे जारी केले जाणार आहे. या नाण्याची निर्मिती मुंबई टांकसाळमध्ये होणार असून, नाण्याची किंमत अंदाजे 4000 रुपयांच्या आसपास असेल.