SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. इतरांवर तुमची उत्तम छाप पडेल. आध्यात्मिक गोष्टींकडे कल वाढेल. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. अति श्रमाचा ताण जाणवेल. वेळेचे व्यवस्थापन आणि आर्थिक नियोजन लाभाचे. प्रगतीचे नवे मार्ग शोधा. प्रगतीचा योग आहे. संधी साधाल तर यशस्वी व्हाल. आज तुम्हाला डोक शांत ठेवून विचारपूर्वक कृती करणे आवश्यक आहे.

वृषभ (Taurus): उगाच त्रागा करू नका. मनाची चंचलता कमी करण्याचा प्रयत्न करावा. कचेरीची कामे अडकून राहतील. दूरच्या प्रवासाचा योग येऊ शकतो. घरात अधिकार वाणीने वागाल. परिस्थितीशी जुळवून घेणे, धोरण लवचिकता राखणे फायद्याचे. वेळ पाहून परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेणे हिताचे. तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायद्याचे. आर्थिक व्यवसायात पैशांचे व्यवहार जपून करा. घरातील वयोवृद्धांचा मान राखा.

मिथुन (Gemini) : उगाचच चिडचिड कराल. कामात मन गुंतवण्याचा प्रयत्न करावा. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. नवीन लोकांशी संपर्क होईल. नोकरीच्या ठिकाणी कामे सुरळीत पार पडतील. हिशोबी राहणे हिताचे. आत्मनिर्भर होणे फायद्याचे. कायदा नियम पाळणे आणि तब्येत जपणे लाभाचे. दिवस छान आहे. आजचा दिवस तुम्हाला आनंदात घालवता येणार आहे. मित्रपरिवारासह वाद घालणे टाळा.

कर्क (Cancer) : दिवस आपल्या आवडीप्रमाणे घालवाल. कमिशन मधून मिळणार्‍या फायद्याचा लाभ उठवा. धार्मिक कामातून मान वाढेल. वरिष्ठांना नाराज करू नका. पोटाची काळजी घ्यावी. आत्मनिर्भर व्हा. विसंबून राहणे टाळा. आर्थिक नियोजन लाभाचे. उत्पन्न वाढीचा योग आहे. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळेल. आई-वडिलांकडून साथ लाभेल. थोडा अशक्तपणा वाटेल पण आराम केल्यास उत्साहित वाटेल.

Advertisement



सिंह (Leo) : भक्तीमय वातावरणाचा अनुभव घ्याल. बोलताना सारासार विचार करावा. जुन्या गोष्टीत फार अडकून राहू नका. अकारण होणार्‍या खर्चाकडे लक्ष ठेवा. कामात सहकार्‍यांची साथ मिळेल. स्वतःचे निर्णय स्वतः घ्या. तज्ज्ञाचा सल्ला घेणे हिताचे. नियोजन लाभाचे. जास्त पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. प्रिय व्यक्तीला वेळ द्या. कामाच्या बाबत हलगर्जीपणा करु नका.

कन्या (Virgo) : जवळचा प्रवास चांगला होईल. भावंडांचा सहवास लाभेल. मनाची संवेदनशीलता दाखवाल. नवीन विषय आवडीने जाणून घ्याल. आवडता छंद जोपासाल. परिवारासंबंधित कामे पूर्ण करा. प्रकृतीकडे लक्ष द्या आणि वेळेवर आजाराचे निदान करा. जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीशी वाद घालणे टाळा. मित्रपरिवारासह वेळ घालवा. आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा.

तुळ (Libra) : कामातील उत्साह वाढवावा लागेल. मनातील शंका बाजूला साराव्यात. कौटुंबिक प्रश्न संयमाने हाताळा. प्रवासात सावधानता बाळगा. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. सावध राहा आणि चांगल्या लोकांसोबत चांगले वागा. कायदा नियम पाळा. वाद टाळा. दिवस बरा जाईल. विचारपूर्वक वागा. घरातील ताणतणामुळे त्रास होण्याची शक्यता आहे. घरातील मंडळींची साथ लाभेल.

वृश्‍चिक (Scorpio) : गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. कौटुंबिक सौख्यात वेळ घालवाल. तरुण वर्गाशी जवळीक वाढेल. नवीन मित्र जोडाल. काही बाबीत तडजोड करावी लागेल. प्रगती होईल. कौतुक होईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. खर्चावर नियंत्रण ठेवायला शिकणे हिताचे. खात्री करून मग प्रतिसाद द्या. ऐकीव माहितीवर विश्वास ठेवणे टाळा. कायदा नियम पाळा. मित्रपरिवारासह आदराने वागा. घरात थोडे वादाचे वातावरण तयार होईल.

Advertisement



धनु (Sagittarius) : कौटुंबिक शांतता जपावी लागेल. जोडीदाराचा वरचष्मा राहील. तडजोडीतून काही प्रश्न मार्गी लावावेत. जुनी कामे पूर्ण करता येतील. फार विचार करत बसू नका. एकटे राहणे टाळा. लोकामध्ये मिसळा. जीवनाचा आनंद घेणे हिताचे. अडचणी सोडविण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायद्याचे. क्षमतेवर विश्वास ठेवून नियोजन केल्यास यशस्वी व्हाल. विचारपूर्वक निर्णय घ्या. अचानक खर्च वाढू शकतो.

मकर (Capricorn) : लोकांचा तुमच्याबाबत गैरसमज होऊ शकतो. कामात चलबिचलता येईल. गप्पांच्या ओघात शब्द देताना काळजी घ्या. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. कामात एकसूत्रता ठेवावी. वाद टाळणे, गोड बोलणे हिताचे. खर्चावर नियंत्रण ठेवणे लाभाचे. तब्येत जपणे गरजेचे. आजचा दिवस उत्साहात जाईल. मित्र परिवारासह बाहेर जाण्यास वेळ काढा. कामे करताना घाईने निर्णय घेऊ नका. आई-वडिलांची साथ लाभेल.

कुंभ (Aquarious) : मानसिक स्थैर्य जपण्याचा प्रयत्न करावा. मुलांवर बारीक लक्ष ठेवावे. राग अनावर होऊ देऊ नका. पत्नीचे मत मान्य करावे लागेल. अचानक धनलाभ संभवतो. गोड बोलणे आणि वाद टाळणे फायद्याचे. आत्मनिर्भर होणे हिताचे. प्रगतीचा योग आहे. आज कंबर दुखी किंवा मानदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे झाल्यास दुर्लश्र करु नका. तसेच आजच्या दिवशी आराम केल्यास उत्तम.

मीन (Pisces) : खर्चाचे प्रमाण वाढेल. बाहेरील गोष्टींमध्ये फार लक्ष घालू नका. सामाजिक जाणीव जागृत ठेवावी. जवळचे नातेवाईक भेटतील. अधिकाराचा स्वबळावर वापर करावा. सकारात्मक विचार आणि सकारात्मक वर्तन हिताचे. तज्ज्ञांचा सल्ला लाभाचा. दिवस प्रगतीचा आहे. योग्य संधी साधणे आवश्यक. आज प्रेमप्रकरणी चुका होणार नाही याची दक्षता घ्या. घरातील मंडळींचे आदेश पाळा. ताणतणाव कमी करण्यासाठी स्वत:ला वेळ द्या.

Advertisement