SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आयटीआर भरण्याचे ‘हे’ आहेत फायदे; जाणून घ्या महत्वाची माहिती

आर्थिक वर्ष (फायनान्शिअल इयर) 2021-22 आणि मूल्यांकन वर्ष (असेसमेंट इयर) 2022-23 साठी आयकर रिटर्न (आयटीआर) भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2022 आहे. त्यामुळे आयकर भरण्याची तयारी करणारे लोक सध्या त्यांच्या उत्पन्नाची गणना करण्यात व्यस्त असणार आहेत. 2,50,000 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या प्रत्येकाला कर भरणे अनिवार्य आहे. आपण करपात्र मर्यादेपेक्षा कमी पैसे कमावले तरीही कर रिटर्न भरण्याच्या अनुषंगाने इतर अनेक फायदे मिळतात. पगारदार व्यक्तीचे उत्पन्न इन्कम टॅक्सच्या रेंजमध्ये येत नाही तरीही काही कारणास्तव टीडीएस कापला जातो.

अशा वेळी या टीडीएसचा परतावा हवा असल्यास तुम्हाला कर भरणे अनिवार्य आहे. टीडीएसचा परताव्यावर दावा करण्यासाठी आयटीआर दाखल करावाच लागतो. आयकर भरण्याचा दुसरा फायदा म्हणजे करदात्याला एखादे कर्ज काढण्यासाठी मदत होते. गृह कर्ज किंवा वाहन कर्ज प्रक्रियेसाठी अर्ज दाखल करताना बँका व्यक्तीच्या उत्पन्नाच्या स्रोतांची पडताळणी करण्यासाठी भरलेल्या आयटीआर रिटर्नच्या प्रती तपासतात. कमीत कमी तीन वर्षांसाठीचा आयटीआर रिटर्न भरलेला आहे किंवा नाही यावरून बँक कर्जाची प्रक्रिया पुढे ढकलते.

ज्या व्यक्तींना बाहेर देशात शिक्षणासाठी जायचे असते अशांना इमिग्रेशन अधिकारी भूतकाळात दाखल केलेल्या कर ठिकाणी रिटर्नच्या प्रती मागतात. आयकर रिटर्न दाखल केल्याने व्हिसा अर्जांची सुरळीत होते आणि व्हिसा मिळण्यास अडचण येत नाही. वैयक्तिक करदात्यासाठी विशिष्ट नुकसानाचा दावा करण्यासाठी – जसे की भांडवली नफा, व्यवसाय इत्यादींसाठी – देय तारखेच्या आत आयकर रिटर्न भरणे अनिवार्य आहे. शेअर मार्केट किंवा म्युचवलं फंडमध्ये नुकसान झाल्यास पुढील वर्षात तो तोटा त्या वर्षीच्या उत्पन्नातून वजा करण्यासाठी निर्धारित वेळेच्या आत आयटीआर भरणे आवश्यक आहे.

Advertisement