SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

केवळ 26 रुपयांत परदेशात जाण्याची संधी, ‘या’ विमान कंपनीची भन्नाट ऑफर..

‘काय ती झाडी, काय ते डोंगर’ म्हणताच इच्छा होते ती भटकंती करण्याची. अगदी असंच तुम्हाला आता राज्य नव्हे भारतभर नव्हे तर फारच कमी पैशांत परदेशात जाऊन फिरण्याची संधी मिळतेय. तुम्ही विचारही करू शकणार नाही की खरंच असं घडू शकतं. जर तुमची इच्छा व्हिएतनाम देश फिरण्याची इच्छा असेल तर यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही.

तुम्हाला विमानात बसण्याचं स्वप्न आणि बाहेरील देशात जाण्याचं स्वप्न एकाच आणि अगदी कमी खर्चात पूर्ण करता येणार आहे. कारण भारतातून व्हिएतनामला फक्त 26 रुपयांमध्ये तुम्ही जाऊ शकता. फक्त 26 रुपयांत तुम्ही भारत ते व्हिएतनामचा प्रवास करू शकणार आहेत. कारण व्हिएतनामची एक विमान कंपनी ही खास ऑफर देत आहे. म्हणून अशी संधी यानंतर क्वचितच तुम्हाला मिळणार आहे. सामन्यांना आयुष्यात अशी संधी पुन्हा मिळणार नाही, असं समजून चला.

Advertisement

प्राप्त माहीतीनुसार, व्हिएतनामच्या व्हिएतजेट (VietJetAir) एअरलाइन्सने ही ऑफर दिल्याचं समजतंय. ही कंपनी फक्त 9,000 व्हिएतनामी डोंग (VND) विमान भाड्यावर एक तिकीट ऑफर घेऊन आली आहे. तसं पाहता व्हिएतनामी चलनाचे मूल्य भारतीय चलनाच्या तुलनेत सांगायचं झालं तर 9,000 व्हिएतनामी डोंग म्हणजे भारतीय चलनात अंदाजे फक्त 25 ते 30 रुपये एवढे होतात. एअरलाइन्सची ही ऑफर सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गावरील उड्डाणांसाठीची आहे.

कधीपर्यंत करता येणार बुकिंग..?

Advertisement

परदेशात जाण्याच्या स्वस्त संधीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला 13 जुलैपर्यंत तिकीट बुक करावे लागतील. यानंतर तुम्हाला 26 मार्च 2023 नंतर प्रवासासाठीची वेळ निवडता येणार आहे.

अधिक माहितीसाठी क्लिक करा 👉 https://www.vietjetair.com/en/

Advertisement

अधिक माहीती अशी की, भारतीय प्रवाशांसाठी ही ऑफर सप्टेंबरपासून सुरू होईल. प्रवाशांना नवी दिल्ली आणि मुंबई ते हनोई, हो ची मिन्ह सिटी आणि व्हिएतनाममधील फु क्वोक तिकीट बुक करू शकतात. याशिवाय व्हिएतजेटने भारतातुन 5 नवीन आंतरराष्ट्रीय मार्गांवर हवाई सेवा देण्यासाठी दिल्ली, मुंबई, हैदराबाद, अहमदाबाद आणि बंगळुरू हे शहर अडा नांग शहराशी जोडलेले आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement